Hot Posts

6/recent/ticker-posts

सर्वाशी समन्वय ठेवून प्रामाणिकपणे काम करा-जिल्हाधिकारी आशिर्वाद

 सर्वाशी समन्वय ठेवून प्रामाणिकपणे काम करा-जिल्हाधिकारी आशिर्वाद





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शासकीस सेवेत काम करताना लोकांशी चांगले वर्तन ठेवा. सर्वाशी समन्वय साधून काम करा. लोकांच्या कामासाठी प्रामाणिक रहा. असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी केले. 
जिल्हा नियोजन मंडळ येथे पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी च्या अंतर्गत शासकीय सेवेत रूजू झालेले उप जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, अतिरिक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी, अतिरिक्त परिवहन अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी असे एकुण 31  अधिकारी यांनी आज जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालस व जिल्हा नियोजन मंडळास भेट देऊन कामकाज जाणून घेतले. 
या प्रसंगी यशदाचे उप महासंचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, यशदा च्या समन्वयक रागिनी सावंत उपस्थित होते. या प्रसंगी यशदाचे उप महासंचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी “मी विकासयात्री” हे पुस्तक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांना भेट दिले. 
शासकीय सेवेत काम करीत असताना जे अधिकारी लोकांप्रति आदर ठेऊन व कामाशी एकनिष्ठ काम करणारे अधिकारी यांना संधी दिली जात आहे. लोकांशी चांगले वर्तन ठेवा. जे आपण काम करीत आहोत. त्या कामांचा अभ्यास करा. वेळोवेळी शासना कडून निर्गमित होणारे शासन निर्णय बाबत अपडेट रहा. कामाविषयी सकारात्मक रहा. प्रत्येक काम करताना ९० टक्के त्यावर उपाय आहे. नियमात राहून प्रत्येक कामावर तोडगा काढता येतो. कामात मिळणारा आनंद, कुटूंब व स्वत:चे आरोग्य सांभाळले तर जीवन यशस्वी होईल. नोकरीत जबाबदारी आहे. परंतू जबाबदारी निभावताना सर्वींशी समन्वय ठेवा. डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे मार्गदर्शन सातत्याने लाभल्याने आम्हा काम करताना प्रेरणा मिळते. असेही जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी बोलताना सांगितले.
यशदाचे उप महासंचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कामाला प्राधान्य द्या. सचोटीने काम करा. लोकांच्या हिताची कामे करा. प्रामाणिक रहा अशा आवाहन केले. 
प्रशिक्षणार्थी अधिकारी यांनी सोलापूर जिल्ह्सात प्रशासनाने राबविलेले विविध उपक्रमामुळे नवीन शिकायला मिळाले असल्याची प्रतिक्रिया दिली.
Reactions

Post a Comment

0 Comments