Hot Posts

6/recent/ticker-posts

५ नंग्या तलवारीसह आरोपीला अटक

 ५ नंग्या तलवारीसह आरोपीला अटक




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जानेवारी २०२६ मध्ये सोलापूर शहरामध्ये महानगरपालीका निवडणुक होणार असलल्याने त्या निवडणुकीच्या काळामध्ये फायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये तसेच निवडणुका या अथमुक्त वातावरणात पार पड़ाव्यात म्हणुन मा. पोलीस आयुक्त सो एम. राजकुमार तसेच पोलीस उप आयुक्त सो विजय कबाडे आणि सहा पोलीस आयुक्त पोमण यांनी वेळोवेळी बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणान्या इसमांचा शोध घेवुन त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्या बाबत आदेश देवुन मार्गदर्शन केले होते.

 दिनांक-२०/१२/२०२५ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की एक इसम धार-धार तलवारी घेवून रुपाभवानी मंदीराकडे जाणाऱ्या लिंगायत स्मशान भुमीच्या कंपाउड जवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी लिंगायत स्मशानभूमी जवळ सापळा रचुन १५:३० वा सुमारास मिळालेल्या माहीतीच्या आधारे संशयीत इसमांस जागीच गराडा टाकुन पकडले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मल्लिनाथ गुरुलिंगप्पा निरगुडे, वय-43 वर्ष, राहणार 58, भवानीपेठ जम्मावस्ती, सोलापूर असे असल्याचे सांगीतले. त्याच्या ताब्यामध्ये अंदाजे १४००० रुपयाचा मुद्देमाल एकुण ०५ नग नंग्या तलवारी मॅनसह मिळुन आल्या आहेत.

मा. पोलीस उप आयुक्त सो (गुन्हे) यांनी जमावबंदी आणि शस्त्रबंदीचा आदेश जारी केला असताना सदरचा इसम याने वरिल वर्णनाचे आणि किमंतीचे शस्त्र बेकायदेशीररित्या स्वताचे जवळ बाळगुन लोकसेवकांनी जारी केलेल्या शस्त्रबंदीच्या आदेशाचा भंग केला आहे. म्हणून त्याचे विरुध्द पो.कॉ. 1504/दत्तात्रय दगडु काटे ने. ओड़भावीपेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी मल्लिनाथ निरगुडे याचे विरुध्द जोडभावीपेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम-37(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. आरोपी याने सदर शस्त्रे कोठुन आणली, कोणास विक्री करणार होता तसेच यापुर्वी त्याने कोणा कोणास शस्त्राची विक्री केली आहे याबाबत तपास चालु आहे.

ही कामगीरी मा.पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त विजय कबाडे, सहा पोलीस आयुक्त पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज मुलाणी आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडीक, पो.हे.कॉ./खाजप्पा परसप्पा आरेनवरु, पो.हे. कॉ. /शिलल अशोक शिवशरण, पो.हे.कॉ./शिवानंद लोहार, पो. है. कॉ. /बसवराज स्वामी, पोशि/ दत्तात्रय दगडु काटे, पो.कॉ./अभिजीत बाळासाहेब पवार, पो.कॉ. /निलेश मारुती घोगरे, पो. कॉ. / विठ्ठल काळजे, पो. कॉ. /सोमनाथ थिटे, पो.कॉ. /दादासाहेब सरवदे या पथकाने पार पाडली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments