Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रावणी सूर्यवंशी ने राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले सलग ३ गोल्ड मेडल

 श्रावणी सूर्यवंशी ने राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले सलग ३ गोल्ड मेडल




दिल्ली (वृत्त सेवा):- 12 ते 17 डिसेंबर दरम्यान दिल्ली येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्विमिंग पुल कॉम्पलेक्स येथे संपन्न झालेल्या 69 व्या नेशनल स्कूल गेम्स ‍स्विमिंग ॲण्ड डायव्हिंग या राष्ट्रीय स्पर्धेत, सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व कराताना डायविंग या क्रीडा प्रकारात 19 वर्ष वयोगटात खेळताना तीन सुवर्ण पदकासह हॅट्रीक साधली आहे.

श्रावणी ही देगांव येथील स्व्‍. सौ. मिनाताई माँसाहेब ठाकरे क्रिडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व  विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय ची विद्यार्थिनी आहे.  या स्पर्धेत श्रावणी ने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले असून,  दि.13 डिसेंबर रोजी डायव्हींग मधील 3 मी. स्प्रिंग बोर्ड मध्ये खेळताना 273.95 गुणासह  श्रावणीने गोल्ड मेडल पटकावले., तर दि.15 डिसेंबर रोजी झालेल्या हायबोर्ड मध्ये खेळताना 271.00 गुणासह दुस-या सुवर्ण पदकावर नांव कोरले. याच क्रीडा प्रकारातील 1 मीटर स्प्रीग बोर्ड ची स्पर्धा दि.16 डिसेंबर रोजी पार पाडली असून, यामध्ये श्रावणी  ही 245.10 गुणासह तिस-या सुवर्ण पदकाची मानकरी ठरली.

या स्विमिंग व डायव्हींग राष्ट्रीय स्पर्धेत देशातील महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्यप्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, केरळ, तेलंगणा, मणिपूर, गुजरात, गोवा, आसाम, हरियाणा, राजस्थान, छत्तीसगड, उत्तरप्रदेश्, दिल्ली, पंजाब या राज्यातील व केव्हीएस, सीआयएससीइ, आयबीएसएसओ, विद्या भारती, च्या मुलीनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत सोलापूरच्या एकटया श्रीवणी सुर्यवंशी ने 3 गोल्ड मेडल मिळवत हॅट्रीक साधत मोलाचा वाटा उचलला.

श्रावणीने आजवर डायव्हींग क्रीडा प्रकारामध्ये शालेय आणि फेडरेशन च्या वतीने घेतल्या गेलेल्या स्पर्धेत -

राज्य पातळीवर  २५ गोल्ड, 6 सिल्वर,  1 बाँझ‍
राष्ट्रीय पातळीवर  20 गोल्ड, 5 सिल्वर, 2 बाँझ,
आतंरराष्ट्रीय  २ गोल्ड,   4  सिल्वर,  2 बाँझ
 
एकूण - 47 गो ल्ड ,  15 सिल्वर,  5 ब्राँझ

याप्रमाणे तिने एकूण 67 पदके वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षात आपल्या नावांवर केली आहेत. यासाठी तिला, तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे
 
या कामगिरीसाठी, दि. 17 डिसेंबर रोजी, दिल्ली येथील संसंद भवन आवारात, सोलापूर च्या विदयमान खासदार प्रणितीताई शिंदे यांनी श्रावणी चा सत्कार करुन तिचे कौतुक केले आहे व तिचे पुढील कारकीदीसाठी श्ुभेच्छा दिल्या आहेत.  तसेच स्व.सौ.मीनाताई ठाकरे (माँसाहेब) क्रिडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देगांव, तालुका उत्तर सोलापूर संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय वानकर,  विश्वस्त विठ्ठल वानकर, प्राचार्य खांडेकर आर वी क्रीडाशिक्षक श्री बेलुरे तसेच सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवृंद यांनी श्रावणीचे अभिनंदन करून हे यश अभिमानास्पद असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments