Hot Posts

6/recent/ticker-posts

ना-हरकत प्रमाणपत्रांसाठी एक खिडकी कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 ना-हरकत प्रमाणपत्रांसाठी एक खिडकी कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करीता नामनिर्देशन अर्ज दाखल करताना उमेदवारांना महानगरपालिकेकडून विविध ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC) सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने नॉर्थकोट प्रशाला येथे सुरू करण्यात आलेल्या एक खिडकी कक्षाला उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, आज पहिल्याच दिवशी  तबल २३० अर्ज दाखल झाले आहे.निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या नावावर असलेल्या मालमत्तेसाठी मालमत्ता कराची ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. उमेदवाराच्या नावावर गाळा (दुकान) असल्यास त्यासाठी स्वतंत्र ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार असून, खुली जागा असल्यास त्या मिळकतीबाबतही संबंधित विभागाकडून एनओसी सादर करणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवार व्यवसाय करीत असल्यास, संबंधित व्यवसाय परवाना (लायसन्स) वैध असल्याचे कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.याशिवाय, उमेदवार महानगरपालिकेचा मक्तेदार (ठेकेदार) आहे किंवा नाही, याबाबतचा सविस्तर तपशील लेखी स्वरूपात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वरील सर्व माहितीबाबत उमेदवारांनी स्वयंघोषणापत्र (Self Declaration) सुद्धा अनिवार्यपणे सादर करावे लागणार असून, त्यामधील माहिती सत्य व अचूक असल्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार आहे.
महापालिकेच्या वतीने दि. २१ डिसेंबर २०२५ पासून नॉर्थकोट प्रशाला येथे एक खिडकी कक्ष कार्यालयीन वेळेत सुरु असून, अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी होत असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी वेळेआधी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपले अर्ज एक खिडकी कक्षात सादर करावेत, उमेदवारांनी मिळकत करा संदर्भात ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र काढून अर्ज सोबत जोडण्यात यावा.असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments