राजराजेश्वरी संगीत विद्यालयाच्यावतीने भाव भक्ती गीतांचा कार्यक्रम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संस्थेत राजराजेश्वरी संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाव भक्ती गीत सादर करुन श्रीगुंरुच्या चरणी सेवा समर्पित केले.
प्रथम श्री तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन राजराजेश्वरी संगीत विद्यालयाचे संचालक प्रविण कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या हस्ते संगीत विद्यालयाच्या बालकलाकारांचे सत्कार करण्यात आला. यावेळी ललिता रॅका, पूर्वा रेके,वैष्णवी घंटे,लहरीका गोणे, रक्षिता सुंकनपल्ली, भक्ती कुंभार, हेमा जुंजा, शुभम तट्टे, मयुरी साखरे,मल्लिकार्जुन खानापुरे, जय झिपटे,
प्रचिता श्रावण आदी बालकलाकारांनी जय गणेश जय गणेश देवा,ज्ञानियांचा राजा,पायोजी मैंने राम रतन धन पायो,तोरा मन दर्पण कहलाये,मी शरण तुला आंबे मा, झाल्या तिन्ही सांजा, शंकराला माझ्या,रडू नको बाळा, जब से नगरी मे तेरे में आया,देवा तुला शोधू कुठे, जागा हो जागा सिद्धरामा,ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, चन्नवीरा चन्नवीरा, यमुनेच्या तीरी,अरे अरे माणसा तू आदी मराठी , हिंदी, कन्नड भाव भक्ती गीते सादर केले. हार्मोनियमवादक प्रविण कुंभार, तबलावादक ऋतुराज सोनवणे, ढोलकीवादक लिंबाजी सुतार, पॅड वादक नंदकुमार रानडे यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे निवेदन प्रवीण कुंभार सर यांनी केले.सूत्रसंचालन शितल पाटील यांनी केले तर विश्वाराध्य मठपती यांनी आभार मानले.यावेळी संस्था खजिनदार ललिता कुंभार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले, धर्मराज बळ्ळारी, ज्ञानेश्वर म्हेत्रे, प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांच्यासह बहुसंख्य श्रोतेगण उपस्थित होते.

0 Comments