देवडी येथे आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
अनगर (कटूसत्य वृत्त):- अनगर येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मौजे देवडी येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा एक भाग म्हणून आरोग्य विभाग व खाजगी वैद्यकीय सेवांच्या सहकार्याने आज देवडी येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या आरोग्य शिबिरात शंभरहून अधिक मुलींची एचबी तपासणी करण्यात आली. तसेच गावातील सर्व नागरिक व वयोवृद्धांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना तत्काळ औषधोपचार देण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
या शिबिराचे उद्घाटन तानाजी थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सचिन थोरात, पोलीस पाटील सज्जन पाटील, नागनाथ चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना राजाबापू थोरात यांनी आरोग्य सांभाळण्यासाठी प्रत्येकाने आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे व त्याबाबत सतत जागरूक राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
या शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. मुजावर, डॉ. नागरगोजे, डॉ. समाधान थोरात, डॉ. गुंडा मॅडम, डॉ. श्रद्धा मॅडम, डॉ. नौशाद मॅडम यांच्यासह गुजरे, अर्चना कांबळे, टेक्निशियन, आरोग्य सेवक व सेविका, फार्मासिस्ट, आशा वर्कर व मदतनीस यांनी सेवा दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी पांडुरंग शिंदे, रमेश चव्हाण, सत्यवान कांबळे, दाजी गुंड, अर्चना गुंड, सत्यवान दाढे, गणेश उघडे, महादेव भडकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले.

0 Comments