राजश्री चव्हाण यांनी दिले पालकमंत्र्यांना निवेदन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026 जानेवारी महिन्यात होत आहे त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 24 क प्रभाग क्रमांक 26 ब ह्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून एसटी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
त्या ठिकाणी भाजपचे निष्ठावंत,कट्टर समर्थक,जे पारदर्शक,पदवीधर, निष्कलंक, निस्वार्थी असावे असे खुद्द राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व भाजपा प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी सहमती दर्शवली आहे. तसेच पक्षात नव्याने आलेले आयाराम गयाराम यांना संधी देण्यात येणार नाही असेही म्हटलेले आहे.
त्या अनुषंगाने आज भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका सौ राजश्री अनिल चव्हाण यांनी राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज्य मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर,आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी,आमदार सुभाष देशमुख,सोलापूर शहर अध्यक्ष सौ. रोहिणीताई तडवळकर,नव्याने भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री दिलीपराव माने यांना निवेदन दिले असून निवेदनात म्हटले आहे की आम्ही 2017 साली भाजपकडून उमेदवारी लढवली होती त्यावेळी प्रभाग क्रमांक 26 ब मधून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आहे. सध्या मी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून कार्यरत असून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून भाजप पक्षाच्या व संघाच्या विचारधारा व भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेला विकास कामाच्या जोरावर व आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न हे आम्ही महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाजाला समजावून सांगितल्यामुळे समस्त पारधी समाज हा भाजप पक्षाच्या पाठीशी उभा राहिला आहे.
सध्या सोलापूर महानगरपालिका 2026 निवडणुका लागल्या असून प्रभाग 24 क मधून वृषाली अनिल चव्हाण व प्रभाग 26 ब मधून अशितोष अनिल चव्हाण हे आदिवासी पारधी समाजातील उच्चशिक्षित,पारदर्शक,पदवीधर निष्कलंक,निस्वार्थी असून इच्छुक उमेदवारी अर्ज भरला असून व मुलाखत दिलेल्या आहेत वरील ठिकाणी भाजप पक्षाकडून एबी फॉर्म दिल्यास ते १००% टक्के निवडून येतील.
तसेच आम्ही प्रभाग 26 मध्ये 222 नगरामध्ये घराघरात पर्यंत पोहोचलो असून अनेक नगराच्या कायापालट केला असल्यामुळे सर्व सामान्य जनता आमच्या पाठीमागे असून त्यांचे मनोगत ही येत आहेत की आमचा विकास फक्त माजी नगरसेविका सौ राजश्री अनिल चव्हाण व त्यांचे नव्याने उमेदवारीसाठी इच्छुक असलेले चिरंजीव आशुतोष अनिल चव्हाण व मुलगी वृषाली अनिल चव्हाण हेच करू शकतात असे प्रभागातील सर्व सामान्य जनता सोशल मीडिया,व्हाट्सअप,फेसबुक, इंस्टाग्राम,वर आपले मनोगत व्यक्त करीत आहेत असे निवेदनात म्हटले आहे.

0 Comments