कर्मवीर कृषी महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम
बार्शी (कटूसत्य वृत्त):- कर्मवीर कृषी महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम झाला. वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि सामाजिक जागृती हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी. बी. शिंदे प्राचार्य होते. प्रमुख वक्ते हेमंत शिंदे, सदस्य, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि उनेश पोदार LIC officer, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बार्शी तालुका अध्यक्ष.
माननीय हेमंतकुमार शिंदे यांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा म्हणजे तर्कहीन विश्वास, जो नुकसानकारक ठरू शकतो, याबद्दल मार्गदर्शन केले. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादामुळे लोक जागरूक होतात आणि तर्कशुद्ध निर्णय घेता येतात, असे ते म्हणाले.
कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक मोरे टी. एस. व इतर प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी प्रज्ञा जनराव यांनी केले.

0 Comments