एस. व्ही. सी. एस. प्रशालेत पालखी सोहळा उत्साहात संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- परमपूज्य तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आठव्या पुण्याराधनानिमित्त एस. व्ही. सी. एस. हायस्कूल एमआयडीसी येथे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमतः काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते पालखीची पूजा करण्यात आली. यावेळी चिटगुपाचे गुरुलिंग शिवाचार्य महास्वामीजी, वडांगळीचे पंडिताराध्य महास्वामीजी व बृहन्मठाध्यक्ष चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती. पालखी पूजनानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत मुलींचा लेझीम पथक, मुलांचे ध्वज पथक, नमो शंकरा नृत्य पथक, विद्यार्थिनी डोक्यावर कलश घेऊन,शंकर- पार्वती व पूज्य महास्वामीजींचा वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. ही मिरवणूक राजीव नगर, किसान नगर या मार्गावरून निघाली. मिरवणूक मार्गात भक्तांनी घरासमोर रांगोळी काढून मिरवणुकीचे स्वागत केले व पालखीचे पूजन करून दर्शन घेतले. भक्ताकडून मिरवणुकीतील सहभागी विद्यार्थ्यांना पाणी, बिस्कीट व चहाची व्यवस्था करण्यात आली होती. या मिरवणुकीत प्रशालेचे मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे, उपमुख्याध्यापक धनंजय नकाते, पर्यवेक्षक संतोषकुमार तारके, प्रशालेतील सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी भक्तीभावाने सहभागी झाले होते. यावेळी महामंगलारती करण्यात आली. वेदमूर्ती परमेश्वर शास्त्री हिरेमठ यांनी पौरोहित्य केले शेवटी सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
.jpg)
0 Comments