Hot Posts

6/recent/ticker-posts

पाणी प्रश्न सोडवणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान

 पाणी प्रश्न सोडवणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान




 आण्णासाहेब बनसोडे यांचा पुण्यात सत्कार


पुणे (कटूसत्य वृत्त):- सोलापुरातील नागरिकांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला पाणी प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रभावी भूमिका घेतल्याबद्दल महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष श्रीयुत आण्णासाहेब बनसोडे यांचा पुणे येथे सत्कार करण्यात आला. हा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे, तसेच मनोज चलवादी व सचिन चलवादी यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी सोलापूर शहरातील पाणीपुरवठा, नागरी सुविधा, तसेच आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासात्मक मुद्द्यांवर विधानसभा उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे यांच्यासोबत सखोल व सकारात्मक चर्चा झाली. सोलापूरच्या पाणी प्रश्नावर राज्य पातळीवर तातडीने निर्णय घेऊन तो मार्गी लावल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष आभार मानले.
दरम्यान, विधानसभेचे उपाध्यक्ष श्रीयुत आण्णासाहेब बनसोडे यांचे सुपुत्र सिद्धार्थ बनसोडे हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, रविवारी पुण्यात त्यांच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ झाला. या प्रचार रॅलीमध्ये सोलापुरातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे, संघटक सचिन चलवादी व मनोज चलवादी यांनी सहभागी होत सिद्धार्थ बनसोडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी युवकांची भूमिका महत्वाची असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भक्कम यश संपादन करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Reactions

Post a Comment

0 Comments