Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी शिक्षण संस्थेच्यावतीने योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या पादुकांची मिरवणूक उत्साहात

 नेताजी शिक्षण संस्थेच्यावतीने योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या पादुकांची मिरवणूक उत्साहात 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने श्रीगुरुंच्या  पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

प्रथम अशोक चौक येथील नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या निवासस्थानी 'श्री'च्या पादुकांची रुद्राभिषेक व सहस्त्र बिल्वार्चन महापूजा काशी पीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात पार पडली. यावेळी श्री बृहन्मठ होटगी मठाचे मठाधिपती श्री बालपस्वी चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, चिट्टगुपाचे श्री गुरुलिंग शिवाचार्य महास्वामीजी, वडांगळीचे श्री पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी उपस्थित होते. विठ्ठल कुंभार व रूपा कुंभार या  दांपत्याच्या हस्ते श्री गुरूंच्या पादुकांची विधिवत महापूजा पार पडली. वेदमूर्ती धानय्या मठपती, शिवानंद स्वामी, विश्वाराध्य मठपती यांनी धार्मिक विधिवत पौरोहित्य केले. त्यानंतर जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी व उपस्थित सर्व शिवाचार्यांचे संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार परिवाराच्यावतीने पाद्यपूजा व गुरूंचा सन्मान करण्यात आला. महापूजेनंतर पुरवंतासह व पारंपरिक वाद्यवृंदानी मिरवणुकीला प्रारंभ झाला. फुलांनी सजवलेल्या पालखीत महास्वामीजींची प्रतिमा व महास्वामीजींच्या पादुकां तसेच  मोठ्या बग्गीत महास्वामीजींची मोठी प्रतिमा, नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संस्थेच्या विविध शाखेतील लेझीम पथक, टिपरी पथक, नृत्य पथक,ढोल पथक व विविध संतांच्या व देवदेवतांच्या सजीवातील बालकलाकारासह हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत मिरवणूक निलम नगरकडे मार्गस्थ झाली. सनई, पूरवंत , श्री ची पालखी, बग्गीतील प्रतिमा, सुहासिनींची आरती पथक अशा क्रमाने शिस्तबद्ध रीतीने मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी भाविक भक्त पालखीचे स्वागत करुन श्रीगुंरुच्या पादुकांचे दर्शन आशिर्वाद घेत होते. महिला भाविकांनी आरती करून आशिर्वाद घेत होते.राजराजेश्वरी शाळेतील ओंकार भाईकट्टी( शंकर ),श्रद्धा आहेरवाडी (पार्वती), विशाल सुलगुडले (गणपती ),हर्षिता उसाकोयल (रिद्धी), वैष्णवी पलवंचा( सिद्धी), नेताजी प्राथमिक शाळेतील आदित्य बिराजदार (सिद्धेश्वर महाराज), राज दोडमणी (महात्मा बसवेश्वर), स्वराज्य जाधव(मन्मथ स्वामी),समृद्धी पगड्याकुल (अक्क महादेवी) श्रेया काटमोरे (हेमरेड्डी मल्लम्मा), नेताजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांजल बनसोडे (झाशीची राणी), ओंकार डोंगराजे (महादेव) ऋषिकेश वन्नम (महास्वामीजी)  ओंकार सानप(विठ्ठल) नैनाक्षा मेरगु (रुक्मिणी) आदी बालकलाकारांनी विविध संत, महात्मा व देवदेवतांच्या वेशभूषेत आकर्षक दिसत होते. मिरवणूक पाच्छा पेठ,जुना कुंभारी नाका,आकाशवाणी केंद्र, नीलम नगर, शरण मठ,थोबडे नगरमार्गे नेताजी प्रशालेकडे मार्गस्थ झाली. ठीक अकरा वाजता प्रशालेच्या प्रांगणात आल्यानंतर शाळेच्यावतीने स्वागत करण्यात आले.पुन्हा प्रत्येक पथकाने आपली कला सादर केल्यानंतर महामंगल आरतीने मिरवणुकीची सांगता झाली. श्रीगुंरुच्या पादुका दिवसभर दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.यावेळी सर्व सदभक्तांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती . मिरवणूक दरम्यान सिद्धाराम खजूरगी, राहुल गंदुरे,पवन देसाई ,उडचान ,मामड्याल यांनी विद्यार्थ्यांना पाणी वाटप केले.दरम्यान ठिकठिकाणी मल्लिनाथ जमखंडी यांनी आकर्षक रांगोळी काढून सेवा समर्पित केले.मिरवणुकीत संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार, खजिनदार ललिता कुंभार,गुरुशांत धुतरगावकर,राजशेखर फताटे, सिद्धेश्वर नरोळे, सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले, रेवणसिद्ध रोडगीकर, राजशेखर स्वामी, महांतेश कौलगी, षडाक्षरी स्वामी,सिद्धलिंग मठमारी, ज्ञानेश्वर म्हेत्रे धर्मराज बळ्ळारी, लक्ष्मीकांत त्रिशुले,,प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांच्यासह नेताजी शिक्षण संस्थेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयश्री बिराजदार, अशोक पाटील, सुरेश बिराजदार, अंगद तोरणे, चंद्रशेखर पाटील, विनायक कोरे, शिवानंद पुजारी, सिद्धाराम कुंभार, संतोष प्रचंडे,हनुमंत कुरे, वैशाली गुजर,प्रशांत बत्तुल, जगदेवी निंबर्गी,राजश्री कोळी,आदींनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचलन शितल पाटील यांनी केले.


Reactions

Post a Comment

0 Comments