Hot Posts

6/recent/ticker-posts

स्व. वसंतराव नाईक यांचे विचार प्रत्येक तांड्यात रुजवण्याचा निर्धार- बापूराव राठोड

  स्व. वसंतराव नाईक यांचे विचार प्रत्येक तांड्यात रुजवण्याचा निर्धार- बापूराव राठोड


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- तांडे, वाड्या व वस्त्यांमध्ये वास्तव्य करत भारतभर भटकंती करीत जीवन जगणाऱ्या बंजारा समाजाला संघटित करण्यासाठी स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची स्थापना केली. त्यांच्या विचारांचा वारसा प्रत्येक तांड्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार संघाचे प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड यांनी व्यक्त केला.
हा निर्धार ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान व नवनिर्वाचित बंजारा नगरसेवकांच्या सत्कारप्रसंगी व्यक्त करण्यात आला. हा कार्यक्रम सोलापूर येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ असलेल्या पूजा लॉन्स येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजापूरचे माजी सभापती प्रकाश चव्हाण होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. भोजराज पवार, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार समिती अध्यक्ष संदीप अण्णा राठोड, संजय राठोड, मोतीराम राठोड, हरीश  जाधव, बंटी राठोड, प्रा. लालसिंग रजपूत, आर.डी. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज आणि स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. प्रा. भोजराज पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचे उद्दिष्ट व रूपरेषा स्पष्ट केली.
याप्रसंगी अक्कलकोटचे नवनिर्वाचित नगरसेवक बंटी राठोड, मुखेडच्या शकुंतला चव्हाण, नळदुर्गच्या क्षमाताई राठोड आणि गंगाखेडच्या कविता राठोड यांचा बापूराव राठोड यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
यानंतर संघाच्या विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व किट प्रदान करण्यात आले. त्यामध्ये राज्य उपाध्यक्ष प्रा. भोजराज पवार, सोलापूर जिल्हाध्यक्ष मोतीलाल राठोड, शहराध्यक्ष महेश पवार, अक्कलकोट अध्यक्ष संदीप चव्हाण, दक्षिण सोलापूर अध्यक्ष प्रकाश पवार, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष बबलू राठोड, मोहोळ तालुकाध्यक्ष दिलीप राठोड, मंगळवेढा अध्यक्ष आशिष राठोड, बार्शी अध्यक्ष संतोष राठोड तसेच शहर युवक अध्यक्ष अंकुश राठोड यांचा समावेश होता.
सर्व पदाधिकाऱ्यांना ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतीने शपथ देण्यात आली. यावेळी बापूराव राठोड, प्रा. भोजराज पवार, संदीप राठोड, प्रा. लालसिंग रजपूत, आर.डी. चव्हाण, संजय राठोड, प्रकाश चव्हाण, प्रकाश राठोड आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments