Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्हा शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी रणजीत थिटे यांची निवड

 सोलापूर जिल्हा शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी रणजीत थिटे यांची निवड 



अनगर (कटूसत्य वृत्त):- लोकनेते बाबुराव पाटील प्राथमिक शिक्षक पतसंस्था अनगरचे चेअरमन रणजीत थिटे यांची सोलापूर जिल्हा शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीबद्दल माजी आमदार राजन पाटील लोकनेते चेअरमन बाळराजे पाटील व सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
अनगर येथील कै शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय त्यांच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी प्राचार्य चंद्रकांत ढोले यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी राष्ट्रीय स्तरावरती निवड झालेली या प्रशालेची माजी विद्यार्थीनी मोहिनी पारवे हिने राष्ट्रीय स्तरावर फोकस स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल तिचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी उपप्राचार्य महादेव चोपडे पर्यवेक्षक माधव खरात परमेश्वर थिटे माधवी पाचपुंड अनुराधा गोडसे अनुपमा वरवटकर सोमनाथ गुंड विलास गुंड क्रीडाशिक्षक दाजी गुंड सत्यवान दाढे बापूराव घुले महादेव पवार चंद्रकांत सरक तात्या गायकवाड आदी शिक्षक व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments