Hot Posts

6/recent/ticker-posts

हभप जयवंत बोधले यांच्या हस्ते वृक्ष संवर्धन दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

 हभप जयवंत बोधले यांच्या हस्ते वृक्ष संवर्धन दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

बार्शी (कटूसत्य वृत्त):- वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या वृक्षसंवर्धन दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन गुरुवर्य हभप  जयवंतमहाराज बोधले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. विलास जगदाळे, नानासाहेब सुरवसे, सोमनाथ ढगे,पत्रकार संजय बारबोले हे उपस्थित होते. वृक्ष संवर्धन दिनदर्शिकेचे हे पाचवे वर्ष असून गेल्या पाच वर्षापासून वृक्ष संवर्धन समिती बार्शी कडून ही दिनदर्शिका प्रकाशित केली जाते. विविध दुर्मिळ वृक्षांची तसेच पर्यावरण उपयोगी जैवविविधता यांची माहिती असलेली तसेच वर्षभरातील  पर्यावरण विषयक प्रत्येक दिवसाची नोंद असलेली आणि बार्शी शहरातील सर्व सामाजिक संघटनेच्या वर्धापन दिनाची आणि आपल्या शहर व परिसरातील महत्वाच्या घटनांची माहिती असलेली ही एकमेव दिनदर्शिकाआहे.
या दिनदर्शिके मध्दे असलेल्या दुर्मिळ वृक्षांची वाचनीय माहिती या मुळे ती महाराष्ट्र भर च्या पर्यावरण प्रेमी च्या पसंतीस उतरलेली आहे अशी माहिती वृक्ष संवर्धन समिती चे अध्यक्ष उमेश काळे यांनी दिली.तसेच दिनदार्शिके साठी जाहिरात देऊन आर्थिक सहकार्य केल्याबद्दल सर्व जाहिरात दारांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी हभप जयवंत महाराज बोधले यांनी वृक्ष संवर्धन समितीच्या कार्याचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरेंद्र भंडे,प्रा. आनंद धुमाळ राहुल तावरे मोहम्मद शेख बाबासाहेब बारकुल महेश बकशेट्टी,उमेश नलवडे,योगेश गाडे,अनमोल वाघमारे,अक्षय घोडके,प्रा.सचिन चव्हाण, संतोषकुमार गायकवाड, काका अडसुळे,बुगडे सर,अक्षय भोईटे,सचिन मस्के,गणेश कदम,जयेश गुप्ता,सुनील फल्ले,सौदागर मुळे,यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments