तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या पादुकांची शनिवारी मिरवणूक
नेताजी शिक्षण संस्थेच्यावतीने विविध कार्यक्रम
सोलापूर (कटुसत्य वृत्त):-निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने शनिवारी श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त अशोक चौक ते निलम नगर पर्यंत श्री गुरुंच्या पादुकांच्या पालखीचे सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
शनिवार दि.२० डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता अशोक चौक येथील नेताजी शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात काशी पीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात श्री गुरु पादुकांचे रुद्राभिषेक,सहस्त्र बिल्वार्चन व महामंगल आरती झाल्यानंतर मिरवणूकीला प्रारंभ होणार आहे. मिरवणूक अशोक चौक, आकाशवाणी रोडवरील निलम नगर,शरण मठ मार्गाने नेताजी प्रशालेकडे मार्गस्थ होणार आहे. या मिरवणुकीत श्री गुरुंच्या पादुकांची पालखी, ट्रॅक्टरवर भव्य प्रतिमा, विविध गावचे पुरवंत,चार बग्गीत शाळेतील बालकलाकार विविध देवदेवतांच्या सजिव देखाव्यासह,चार लेझीम पथक, ढोल पथक, नृत्य पथक, विविध वाद्य वृंदासह हजारो भक्तगण सहभागी होणार आहेत. ठिक ११.०० वाजता नेताजी प्रशालेत महाआरती करुन मिरवणूकीची सांगता होणार आहे तरी सदभक्तांनी श्री गुरुंच्या पादुकांचे दर्शन आशिर्वाद घ्यावे तसेच सांय.६.०० वाजता पारितोषिके वितरण समारंभ,सांय.७.०० तपोरत्नं भाव भक्ती गीतांचा कार्यक्रम,रात्रो ठिक १०.०५ वाजता श्री तपोरत्नं आत्मज्योतीचे दिपप्रज्वलन व श्रद्धांजली समर्पण कार्यक्रम होणार आहे तरी सर्व सदभक्तांनी उपस्थित राहून श्री गुरुंचे दर्शन आशिर्वाद घ्यावे असे आवाहन नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी केले आहे.
0 Comments