संस्कृती, संस्कार, समाजाला पुढे घेऊन जाण्याचा विचार नानासाहेब यांच्यामध्ये होता- डॉ. विकास शहा
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- घरामध्ये एक विचारांचा, कर्तुत्वांचा, नेतृत्वांचा माणूस असावा आणि त्या माणसाने घरामध्ये संस्कार घडवावे हे सगळे आदर्श नानासाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने मला या ठिकाणी पाहायला मिळाले.संस्कृती, संस्कार, समाजाला पुढे घेऊन जाण्याचा विचार नानासाहेब यांच्यामध्ये होता. नानासाहेबांचा ज्यांना सहवास लाभला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी लाभली ते लोक भाग्यवान असल्याचे मत लेखक, जेष्ठ पत्रकार, प्रमुख व्याख्याते डॉ. विकास शहा यांनी व्यक्त केले.
ते नातेपुते येथील एस. एन. डी. इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल येथे घेण्यात आलेल्या समाजभूषण नानासाहेब देशमुख यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त बोलत होते. ते पुढे बोलत असताना म्हणाले की, नातेपुते चा शेतकरी सदन झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या मुलांनी चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊन चमकले पाहिजे हा विचार मनात घेऊन नातेपुते सारख्या परिसरामध्ये समाजभूषण नानासाहेब देशमुख यांनी कामाची सुरुवात केली होती. समाजभूषण अनेक होतील वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतील परंतु माळरानामध्ये सुंदर पद्धतीचे नंदनवन निर्माण करण्याची किमया त्यांनी केले ते नानासाहेब दुसरे होणे नाही. नातेपुते विकासाच्या वाटेवर पुढे नेत नेत नानासाहेबांनी संपूर्ण आयुष्य वेचले असल्याचे प्रतिपादन डॉ. विकास शहा यांनी व्यक्त केले. यावेळी प्रमुख व्याख्याते डॉ.विकास शहा, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे, देशमुख धैर्यशील देशमुख, नाथाजीराव देशमुख, अमरशील देशमुख, हेमंत देशमुख, भैय्यासाहेब देशमुख, स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमुख, डॉ. एम. पी. मोरे, अँड. डी. एन. काळे, अर्जुन जठार, महेश शेटे, अँड. शिवाजीराव पिसाळ, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य माऊली पाटील, धनाजीराव देशमुख, रणवीर देशमुख, उद्योजक अतुल बावकर, आरपीआयचे नेते एन. के. साळवे, युवराज वाघमारे, नगरसेवक सुरेंद्र सोरटे, शब्बीर काझी, इमाम मुलानी, अरविंद पाठक, संपत पांढरे, विलास काळे, वामन पलंगे, जितेंद्र पलंगे, जवाहर इंगोले, डॉ. तेजस चंकेश्वरा, अभिजीत दोशी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून समाजभूषण नानासाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका पानसरे तर प्रास्ताविक प्राचार्य संदीप पानसरे यांनी केले असून आभार उपप्राचार्य शकूर पटेल यांनी मानले कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे पीआरओ मनोज राऊत तसेच सुरज ननवरे, विनायक बरडकर, योगिता शेळके, ज्योती मोरे या शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक तसेच रेणुका पतसंस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चौकटीत :
समाज भूषण नानासाहेब देशमुख यांनी सामाजिक राजकीय कारकीर्दीत १९ वर्ष सरपंच पद भूषवून नातेपुते गावचा कारभार पाहिला मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी सहकाऱ्यांबरोबर काम पाहिले नातेपुते गावचे निकोप राजकारण असल्याने तोला मोलाचे कार्य मिळून केले राजकारणामध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी १९९२ साली मध्ये पदार्पण झालं त्या काळामध्ये समाजभूषण नानासाहेब देशमुख यांना जोडीला घेतले वेगळ्या विचाराने निवडणूक लढविणारे सुद्धा विकासाच्या दृष्टीने नानासाहेबांना मोलाची साथ देत होते राजकीय अनेक घडामोडी होत असतात परंतु काम करण्याची भावना या गावांमध्ये नानासाहेब देशमुख व सर्व पुढारी यांनी जी परंपरा घालून दिली ते आज तागायत नातेपुते गावांमध्ये टिकून आहे. ग्रामीण भागातील मुलांना इंग्लिश मीडियम शिक्षणाची सोय व्हावी ही धारणा सातत्याने त्यांच्या मनामध्ये होती त्यांचे स्वप्न आपण साकार झालेले पाहतो नातेपुते मध्ये अधिकृत रित्या सीबीसीईची मान्यता असणारे समाज भूषण नानासाहेब देशमुख एज्युकेशन सोसायटीचे एस एन डी इंटरनॅशनल स्कूल आज नातेपुते सारख्या ग्रामीण भागात चांगल्या दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना या ठिकाणी देत आहे.
बाबाराजे देशमुख
( सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष )

0 Comments