सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या उपरोक्त आदेशान्वये राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीच्या (एकूण 288) सदस्य पदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केलेला आहे. सदरील निवडणूकीच्या जाहिर झालेल्या कार्यक्रमानुसार, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, अकलुज, बार्शी, दुधनी, मैंदर्गी, करमाळा, कुडुवाडी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला नगरपरिषद व 01 अनगर नगरपंचायत सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि. 02 डिसेंबर, 2025 रोजी मतदान व दि. 03 डिसेंबर, 2025 रोजी मतमोजणी होणार आहे
सदर निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित नगरपरिषदा / नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रामध्ये सार्वजनिक शांतता व कायदा व सुव्यवस्था अवाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी, कुमार आशिर्वाद (भा.प्र.से.) यांनी ,महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सोलापूर जिल्ह्यात निवडणूक असलेल्या संबंधित नगरपरिषदा / नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी /विदेशी किरकोळ मद्य विक्री व ताडी विक्री अनुज्ञप्ती (नमुना एफएल-2. एफएल-3, एफएल-4 (क्लब अनुज्ञप्ती), एफएल/बीआर-2, सीएल-2, सीएल-3., सीएल/एफएल/टिओडी-3, टिडी-1 इ.) खालील प्रमाणे बंद ठेवण्याचे आदेश देत आहे.
कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी - दि.1 डिसेंबर 2025 (मतदान दिवशीच्या आधीचा दिवस) -अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे क्षेत्र-सोलापूर जिल्हयातील नगरपरिषद क्षेत्र अक्कलकोट, अकलुज, बार्शी, दुधनी, मैंदर्गी, करमाळा, कुर्डूवाडी , मोहोळ, पंढरपूर, सांगोला नगरपरिषद व 01 अनगर नगरपंचायत. - बंदचा कालावधी - संपूर्ण दिवस
कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी - दिनांक 02 डिसेंबर 2025 . (मतदानाचा दिवस) संबंधीत निर्वाचन क्षेत्र- अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे क्षेत्र- सोलापूर जिल्हयातील नगरपरिषद क्षेत्र अक्कलकोट, अकलुज, बार्शी, दुधनी, मैंदर्गी, करमाळा, कुर्डूवाडी, मोहोळ, पंढरपूर, सांगोला नगरपरिषद व 01 अनगर नगरपंचायत - बंदचा कालावधी - संपूर्ण दिवस
कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी - दिनांक 03 डिसेंबर 2025 (मतमोजणीचा दिवस) संबंधीत निर्वाचन - अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे क्षेत्र- सोलापूर जिल्हयातील नगरपरिषद क्षेत्र अक्कलकोट, अकलुज, बार्शी, दुधनी, मैंदर्गी, करमाळा, कुर्डूवाडी, मोहोळ, पंढरपूर, सांगोला नगरपरिषद व 01 अनगर नगरपंचायत- बंदचा कालावधी- संपूर्ण दिवस
ज्या निर्वाचन क्षेत्रातील निवडणूक बिनविरोध होईल तेथे उपरोक्त आदेश लागू राहणार नाहीत. सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकां विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 54 व 56 मधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
असे आदेश जिल्हाधिकारी, कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.
0 Comments