“विकासाचे श्रेय लाटाल तर जनतेसमोर उघडे पाडू”
सोलापूर विकास मंचचा ठाम इशारा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांसमोर एक महत्त्वाची व स्पष्ट भूमिका मांडत सोलापूर विकास मंचने ठाम शब्दांत सांगितले आहे की, खाली नमूद केलेली सर्व विकासकामे केवळ आणि केवळ सोलापूर विकास मंचच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच मार्गी लागलेली आहेत. जर कोणत्याही खासदार, आमदार किंवा महानगरपालिकेत निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांनी ही कामे स्वतःच्या नावावर खपविण्याचा प्रयत्न केला, तर सोलापूर विकास मंच त्या सर्वांना पुराव्यानिशी सोलापूरकरांसमोर उघडे पाडेल, असा स्पष्ट इशारा मंचच्या वतीने आज शनिवार दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी हॉटेल ऐश्वर्या येथे रोजी संपन्न झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात नवीन उद्योग निमिर्ती करून व सोलापुरातील सुशिक्षित बेरोजगार मुला मुलींना गावातच उद्योग व नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न राहतील
सोलापूर विकास मंचचा स्पष्ट संदेश असा आहे की, शहराच्या विकासासाठी राजकारणापेक्षा काम महत्त्वाचे आहे. श्रेयाच्या लढाईत नव्हे तर सोलापूरच्या भविष्यासाठी मंच लढत राहील — आणि खोटे श्रेय घेणाऱ्यांना सोलापूरकरांसमोर उघडे पाडले जाईल.
ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे केतन शहा, मिलिंद भोसले, योगिन गुर्जर, विजय कुंदन जाधव, अॅड.दत्तात्रय अंबुरे, प्रसन्न नाझरे, आनंद पाटील, भारत पाटील, शुभदा पाटील, सुधीर क्षीरसागर, प्रशांत भोसले, अर्जुन रामगिर, गणेश शिलेदार, मिलिंद कदम, सुनिल दुस्सल, वासुदेव आडके, घनश्याम दायमा, इक्बाल हुंडेकरी, विरेंद्र राचर्ला, अमोघसिध्द कोरे, अॅड. संजय मंटगे, योगिनाथ खानापूरे, संतोष कांबळे, नरेंद्र भोसले, प्रदीप जाधव, शिवकुमार देडे शाफुर काझी आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.
.png)
0 Comments