आजही त्याच किमतीत जागा देण्यास तयार- कुमार करजगी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जुनी मील जागेबाबत काही स्वार्थी राजकीय व बिल्डर मंडळींकडून जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात असून सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप करत ज्या दरात न्यायालयातून जमीन मिळाली, त्याच दरात आजही ती देण्यास आपण तयार असल्याचे स्पष्ट करत, प्रलंबित तक्रारींबाबत दोन्ही बाजूंच्या वकिलांमार्फत चर्चा करून न्यायालयात अॅफिडेव्हिट देण्याची तयारी असल्याची माहिती उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन डॉ. कुमार करजगी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१९६३ साली जुनी मील कायमस्वरूपी बंद झाल्यानंतर तब्बल १५ हजार कामगार बेरोजगार झाले. न्यायालयात योग्य वेळी क्लेम्स दाखल न झाल्याने कामगारांना त्यांच्या कष्टाचा पैसा मिळाला नाही.
या अन्यायाविरोधात १९८८ साली कुमार करजगी यांनी जुनी मील बेकार कामगार व वारसदार संघर्ष समिती स्थापन करून उच्च न्यायालयात लढा उभारला. २५ वर्षांनंतर ९ हजार कामगारांचे क्लेम्स न्यायालयात दाखल करून जुनी मीलच्या जमिन विक्रीतून कामगारांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले. अल्प दरात जमीन बळकावण्याचा काही भांडवलदार व राजकीय मंडळींचा डाव यामुळे उधळून लागला, असा दावा करजगी यांनी केला.
न्यायालयाच्या आदेशानुसार जुनी मीलच्या १ ते ५ लॉटची जमीन उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावे झाली. त्यानंतर १९९९ साली चिठ्ठी पद्धतीने ७७८ नागरिकांना प्लॉटचे वाटप करण्यात आले असून अनेकांनी घरे बांधून वास्तव्यास सुरुवात केली आहे. मात्र महापालिकेच्या काही आरक्षणांमुळे अद्याप १९२ नागरिकांना बांधकामात अडचणी येत आहेत.
ज्या दरात न्यायालयातून जमीन मिळाली, त्याच दरात आजही ती देण्यास आपण तयार असल्याचे स्पष्ट करत, प्रलंबित तक्रारींबाबत दोन्ही बाजूंच्या वकिलांमार्फत चर्चा करून न्यायालयात अॅफिडेव्हिट देण्याची तयारी असल्याचे कुमार करजगी यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, बिल्डर कडून पैसे घेऊन काही लोक विनाकारण वेळोवेळी आरोप करून या कार्यात अडचणी निर्माण करत आहेत. वास्तवात ते सदस्यही नाहीत. खोटी कागदपत्रे तयार करून हे लोक आरोप करतात. त्यांना न्यायालयाने फटकारले आहे. जामिनावर ते बाहेर आहेत, असा आरोप डॉ. कुमार करजगे यांनी यावेळी केला.
या पत्रकार परिषदेस केतन शहा, कमल काबरा आदी उपस्थित होते.
.png)
0 Comments