Hot Posts

6/recent/ticker-posts

आयुर्वेदामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा व संशोधनाचा वापर वाढला पाहिजे- मुख्यमंत्री डॉ. सावंत

 आयुर्वेदामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा व संशोधनाचा वापर वाढला पाहिजे- मुख्यमंत्री डॉ. सावंत



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- इंटिग्रेटेड प्रॅक्टिस ही काळाची गरज आहे. आपण स्वतः देखील निमा संघटनेचा भाग आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुर्वेदाला जागतिक पातळीवर नेण्याच्या प्रयत्नाला यश येण्यासाठी आयुर्वेदामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा व संशोधनाचा वापर वाढला पाहिजे. त्यासाठी शासनाकडून भविष्यात आणखी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून डॉक्टरांशी संवाद साधताना दिली.
         नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), सोलापूर शाखा आणि एसीएस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी "एसीएस निमाकॉन २०२५" या  राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन महालक्ष्मी बँक्वेट्स,  सोलापूर येथे  निमाचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले. अपरिहार्य कारणामुळे उद्घाटक म्हणून डॉ. सावंत हे उपस्थित राहू शकले नाहीत. यामुळे  व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला.
           यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून एसीएस हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ.राहुल कारीमुंगी, डॉ. प्रमोद पवार, डॉ. दीपक गायकवाड- पाटील, निमा केंद्रीय शाखेचे  डॉ. शांतीलाल शर्मा,  डॉ. विनायक टेंभुर्णीकर, डॉ. गजानन पडघन, डॉ. सायबू गायकवाड, डॉ.शैलेश निकम, डॉ. वैशाली पडघन, राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. राजू ताटेवार, डॉ. साधना कुलकर्णी, डॉ. मृण्मयी मासोदकर, डॉ. पल्लवी माने, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. तुषार सूर्यवंशी, डॉ. अभय लुणावत डॉ. रविराज गायकवाड, डॉ. अनुश्री मुंढेवाडी, डॉ. राजश्री मठ आदी मान्यवर उपस्थित होते.
        यावेळी निमा वुमन फोरम यांनी बनविलेल्या निमा डायरीचे व सोलापूर शाखेच्या सोविनियरचे प्रकाशन करण्यात आले. हृदयरोग तज्ञ डॉ. राहुल कारीमुंगी डॉ. प्रमोद पवार डॉ.दीपक गायकवाड पाटील यांनी हृदय रुग्णांना आधुनिक एआय आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून अवघड हृदय शस्त्रक्रिया व हृदयरोग उपचारातील नवीन उपकरणे यांचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी डॉ. सुनील हिलालपुरे, डॉ. मीनल चिडगुकर, डॉ. रणजीत कदम, डॉ.प्रशांत धोंड, डॉ. सपळे, डॉ. विनोद बन, डॉ. सुजित जहागीरदार, डॉ. प्रफुल्ल कल्याणकर यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
         कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सुभाष भांगे, डॉ.अमोल माळगे, डॉ. आसिफ शेख, डॉ.अभिजित पुजारी, डॉ. नितीन बलदवा, डॉ. नागनाथ जिड्डीमनी, डॉ.प्रवीण ननवरे, डॉ.श्रुती मराठे डॉ. अश्विनी देगावकर डॉ. पल्लवी भांगे, डॉ. समर्थ वाले, डॉ. आयाचित, डॉ.उत्कर्ष वैद्य यांनी परिश्रम घेतले.

पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची तरतूद अबाधित राहावी : डॉ. ताटेवार

 एनसीआयएसएमच्या नियमानुसार बीएएमएस व बीयूएमएस डॉक्टरांना अभ्यासक्रमात समाविष्ट असणाऱ्या शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देणारा जीआर काढण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शल्य व शालाक्य विभागातील पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची तरतूद अबाधित राहिली पाहिजे, असे निमा महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. राजू ताटेवार यांनी सांगितले.

देशपातळीवर एकच कायदा असावा : डॉ. कुलकर्णी

 आयुर्वेद व युनानी पदवीधारकांसाठी ऍलोपॅथी प्रॅक्टिस संदर्भात राष्ट्रीय स्तरावर एकच कायदा अस्तित्वात यावा. अभ्यासक्रम एकच असूनही काही राज्यांमध्ये आलोपथी परवानगी आहेत तर काही राज्यांमध्ये नाही तर त्यानुसार सर्व राज्यांमध्ये देशपातळीवर एकच कायदा असावा, असे
 निमा सेंट्रल अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी स्पष्ट केले.

सर्व कंत्राटी बीएमएस डॉक्टरांना कायम करावे : डॉ. निकम

 शासकीय सेवेत असणाऱ्या कंत्राटी बी ए एम एस डॉक्टरांना कायम करण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने जी आर काढला आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी होऊन सर्व कंत्राटी बीएमएस डॉक्टरांना कायम करून घ्यावे, अशी मागणी केंद्रीय निमा उपाध्यक्ष डॉ. शैलेश निकम यांनी केली.
Reactions

Post a Comment

0 Comments