Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वच्छतेसाठी मिशन महाग्राम प्रभावी पणे राबवा- परदेशी

 स्वच्छतेसाठी मिशन महाग्राम प्रभावी पणे राबवा- परदेशी


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्वच्छता, शुध्दपाणी, सक्षम प्रशासनासाठी मिशम महाग्राम प्रभावीपण राबवा असे आवाहन मित्राचे सिईओ तखा मुख्यमंत्री यांचे आर्थीक सल्लागार प्रविणसिंह परदेशी यांनी केले.
सोलापूर जिल्हा परिषदेत आज मिशन महाग्राम अंतर्गत सरपंच संवाद उपक्रमास आज मित्राचे सिईओ तथा मुख्यमंत्री यांचे आर्थीक सल्लागार प्रविणसिंह परदेशी यांचे हस्ते शुभारंभ करणेत आला.  सरपंचाशी संवाद साधताना ता बोलत होते. ग्रामविकास विभाग, भारतीय गुणवत्ता परिषद, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करणेत आले होते.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, व्हीएसटीएफ चे राज्य सह मुख्य कार्यकारी अधिकारी  दिलीपसिंह बायस, व्हीएसटीएफ च्या अनु मेहता, भारतीय गुणवत्ता परिषदेचे, दिल्ली येथील श्री विशाल प्रमुख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, महावीर काळे, प्रमुख उपस्थित होते. मित्राचे
सिईओ प्रविणसिंह परदेशी यांनी सरपंच अॅप बाबत सरपंचाशी संवाद साधला. जिल्ह्सातील ४३ गावातील सुरू असलेले कामा बाबत मार्गदर्शन करून स्वच्छतेसाठी पुढाकार घेणेचे आवाहन परदेशी यांनी केले. स्वच्छ गल्ली स्पर्धे बरोबर गावाच्या विकासाची जबाबदारी ग्रामस्थांची आहे. स्वच्छतेचे काम ९० टक्के पेक्षा अधिक आहे. ज्या वेळी मी जिल्हाधिकारी होते त्यावेळी खुप शौचालये कमी होती. या मध्ये
खुप मोठा बदल झाला आहे. जे सरपंच उत्कृष्ठ काम करतील त्यांना *नेतृत्व पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे प्रविणसिंह परदेशी यांनी सांगितले.
२७ गावातील पाणी पुरवठा योजना सोलार आधारित करणेत येत आहेत.  वीजे अभावी पाणी पुरवठा विस्कळीत होऊ नये असा या पाठी मागचा उद्देश्य असल्याचे स्पष्ट केले. ग्रामसभेने ठराव करून या पुढे थकीत वीज बील राहणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. सिईओ कुलदीप जंगम यांनी मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानातील व्हीएसटीएफ मधील ग्रामपंचायतींनी केलेले उपक्रम सरपंच संवाद अॅप वर अपलोड करणेचे आवाहन केले. २०२२ नंतर वीज बीले ग्रामपंचातींना भरावी लागणार आहेत. गावात स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवणेचे आवाहन सिईओ कुलदीप जंगम यांनी केले. धामनेर चे माजी सरपंच शहाजी क्षीरसागर यांनी  लोकसहभागातून राबविलेले विविध उपक्रमाची माहिती सरपंचाना देऊन मानसिकता बदलाचे आवाहन केले. सरपंचानी मिशनमहागिराम बरोबर मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान संजीवनी देणारे असल्याचे सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments