Hot Posts

6/recent/ticker-posts

दोन माजी महापौरांचा अजितदादा राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश

 दोन माजी महापौरांचा अजितदादा राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरात शनिवारी अनेक वर्षे काँग्रेस पक्षात आणि त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत काम करत असलेल्या काँग्रेसचे माजी महापौर यु.एन. बेरिया व नलिनी चंदेले यांनी राष्ट्रवादी भवनात मंत्री व राष्ट्रवादीचे सोलापूरचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.  याशिवाय काँग्रेस पक्षाच्या विद्यमान नगरसेविका परवीन इनामदार, माजी नगरसेवक हारून शेख तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या संघटक मीनल दास यांनीसुद्धा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान जेष्ठ नेते सुधीर खरटमल,प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे,ज्येष्ठ नेते तौफिक शेख ,चंद्रकांत दायमा ,आनंद मुस्तारे,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,वसिम बुऱ्हाण,मकबूल मोहोळकर ,माजी नगरसेविका पूनम गायकवाड ,माजी नगरसेविका तस्लिम शेख, चित्रा कदम ,सायरा शेख,प्रा. श्रीनिवास कोंडी ,जेष्ठ नेते हेमंत चौधरी ,शशिकांत कांबळे,बाबा सालार ,बसवराज बगले,खलील शेख ,अनिल उकरंडे ,अजित बनसोडे ,कलीम तुळजापुरे ,सुजित अवघडे ,साजिद पटेल ,ऍड.जयप्रकाश भंडारे,अमीर शेख ,बसवराज कोळी ,अनिल बनसोडे ,अल्मेहराज आबादीराजे, मार्तंड शिंगारे ,कुमार जंगडेकर ,संजय सांगळे ,समदानी मत्तेखाने, श्यामराव गांगर्डे ,वैभव गंगणे ,सोमनाथ शिंदे ,महेश गाडेकर ,प्रसाद कलटके, सूर्यकांत शेरखाने ,शक्ती कटकधोंड ,अनिकेत व्हसुरे ,सत्यम जाधव ,लखन भंडारे  रुक्मणी जाधव,कविता पाटील ,पूजा धोत्रे ,रेणुका मंद्रुपकर ,सुनीता राजमाने ,रामचंद्र शेटप्पा मंजेली उर्फ अबोली किरण मोहिते
विश्वभुषण कांबळे ,दशरथ शेंडगे ,कणसे ,मास ,राज बिडला ,रोहित माने यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो ,एकच वादा अजित दादा या घोषनांनी राष्ट्रवादी परिसर दणाणून सोडला.

Reactions

Post a Comment

0 Comments