रियाज सय्यद यांच्या नेतृत्वात वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे जिल्हाधिकारी , पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) यांना निवेदन सादर
सोलापूर(कटूसत्य वृत्त):--ई-चलन प्रलंबित दंड तडजोडीबाबत महासंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे जिल्हाधिकारी सोलापूर तसेच पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) यांना महत्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले. २०२५ या वर्षभरात सोलापुरात एकूण चार लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले असून, त्यापैकी तीन लोक अदालती यशस्वीपणे झाल्या आहेत. आगामी लोक अदालत १३ डिसेंबर रोजी होणार असून, या लोक अदालतमध्ये ई-चलन प्रलंबित दंडाची तडजोड, सवलत आणि दंड कमी करण्याबाबत महासंघाने मागणी केली आहे. महासंघाचे पदाधिकारी व चालक प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासन व वाहतूक विभागाकडे खालील बाबींची मागणी केली. याप्रसंगी प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद, प्रदीप शिंगे, इम्रान शेख, तुफान शेख, अल्लहबक्ष शेख, इरफान कल्याणी, रमेश बनसोडे, इर्शाद शेख, मनोहर खांडेकर, इलियास सिद्दिकी, नागेश वाघमारे, राजू सिद्धगणे, फैयाज काजी, अशपाक शेख, मुजम्मिल शेख, उपस्थित होते.

0 Comments