वाळू तस्करांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांची चौकशी करून बदली करावी.
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- अकोले खुर्द येथील वकील पांडुरंग कुबेर तोडकर यांच्यावर वाळू तस्करानी केलेल्या हल्ल्या प्रकरणी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांची चौकशी करून बदली करावी,तसेच मारहाण करून उलट त्यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे चौकशी करून रद्द करावेत अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा लेबर फेडरेशनचे माजी चेअरमन भारतनाना पाटील यांनी दिला आहे.
मौजे अकोले खुर्द येथील वकील पांडुरंग कुबेर तोडकर यांच्यावर टेंभुर्णी हद्दीत १०-१२ वाळू तस्करांनी पोलिसांना नावे का सांगतो या व इतर कारणांनी लोखंडी रॉड,अँगल,लाकडी दांडके यासह प्राणघातक हल्ला केला होता.या मारहाणीत पांडुरंग तोडकर यांची हात व पायाची चार हाडे फ्रॅक्चर झाली आहेत.
या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी अकोले खुर्द व फुटजवळगांव ग्रामस्थांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. करमाळा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर सर्व आंदोलक एकत्रित जमून वाळू माफियांचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर सर्व आंदोलक पायी चालत मोर्चा काढीत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना निवेदन दिले.
संभाजी पाटील म्हणाले की, अकोले-खुर्द येथील ग्रामस्थ वाळू माफियांच्या दहशतीखाली वावरत आहेत.पोलिसांचा धाक राहिला नाही.यास तहसीलदार व पोलीस जबाबदार आहेत.यापुढे कुणीही हात लावण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल .
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पाटील म्हणाले की, सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेत वाळू उपसा बंदीचा ठराव केलेला आहे.शेतकऱ्यांच्या पाईपलाईन फोडल्या जात आहेत.रात्री अपरात्री शेतकऱ्यांना फिरणे अवघड झाले आहे.वाळू माफियांच्या दहशतीखाली ग्रामस्थ वावरत आहेत.यामुळे जलद कारवाई केली पाहिजे.
यावेळी लेबर फेडरेशनचे अध्यक्ष भारतनाना पाटील ,संभाजी उर्फ गोटू पाटील,आकाश पाटील,काँग्रेसचे माढा तालुकाध्यक्ष संजय पाटील , दीपक पाटील, विनोद पाटील, अशोक पाटील,सरपंच कांतीलाल नवले,माजी संचालक संतोष पाटील, महेश पाटील,सचिन पाटील,रामभाऊ पाटील,अनिल तोडकर,स्वप्निल पाटील ,गणेश पाटील, नितीन पाटील,पंडित पाटील,वैभव पाटील, फुटजवळगांवचे सरपंच बापू पवार, प्रहार संघटनेचे रमेश पाटील ,काका पाटील,माजी सरपंच विक्रम पाटील,संपत पाटील, महादेव घाडगे, दीपक शंकर,युवराज पाटील ,योगेश महाडिक,बंडू सातव, कुबेर तोडकर ,संजय तोडकर,प्रकाश खुपसे, विठ्ठल हांडे,बाबुराव डोके,अशोक काशीद, विठ्ठल नवले, विलास घाडगे,किसन घाडगे, सुहास खोचरे, तुषार काशीद यांच्यासह शेकडो आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी हरिभाऊ शिंदे ,महारुद्र तोडकर , स्वप्निल पाटील , शुभम तोडकर यांनी आपल्या भाषणातून वकिलावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली .

0 Comments