वेणुनगर, (कटूसत्य वृत्त):-- वेणुनगर - गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे परिपत्रक अन्वये ऊस तोडणी मजूरांना संपूर्ण हंगाम कालावधीत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे मदतीने कमीत कमी ३ वेळा वैद्यकीय तपासणी करणेत यावी, असे आदेश दिलेले आहेत. त्यास अनुसरुन कारखान्याचे चेअरमन, आमदार श्री अभिजीतआबा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल कारखाना, श्री विठ्ठल सर्व सेवा संघ यांचे वतीने व प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गुरसाळे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १२.१२.२०२५ रोजी दुपारी ४ ते ५ या वेळेमध्ये आपले कारखान्यामध्ये सन २०२५ - २६ हंगामात ऊस तोडणी मजूरांचे लहान मुले व गरोदर माता-भगिनी यांचे करीता मोफत लसीकरण नगरी वसाहतीतील साखर शाळेमध्ये आयोजन केलेले होते. सदर लसीकरण शिबीराचे उद्घाटन कारखान्याचे संचालक श्री सिध्देश्वर शंकर बंडगर, गुरसाळे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री दिपकशेठ शिंदे यांच्या शुभहस्ते व संचालक मंडळ यांचे उपस्थितीत करण्यात आले.
स्वागत व प्रस्ताविकात बोलताना कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्री ए. व्ही. गुळमकर म्हणाले की, सन २०२५-२६ हंगामात ऊस तोडणी मजूरांचे लहान मुले व गरोदर माता-भगिनी यांचे करीता मोफत लसीकरण शिबीराचे आयोजन का केले आहे याचे महत्व पटवून दिले. तरी या लसीकरण शिबीराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे ते म्हणाले. हे शिबीर यशस्वी होणेसाठी गुरसाळे उपकेद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सचिन गुटाळ, डॉ. गणेश दराडे, उपकेंद्र गुरसाळे यांचा सर्व स्टाफ व आशा वर्कर तसेच कारखान्याचे ऊस विकास व फिल्ड स्टाफ यांनी शिबीर यशस्वीपणे पार पाडणेसाठी परिश्रम घेतले. या लसीकरण शिबीरामध्ये २० गरोदर माता व ० ते ५ वर्षे वयोगटातील ७९ लहान मुलांचे लसीकरण करणेत आली.
सदर कार्यक्रमास कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, ऊस तोडणी मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. असि.ऊस विकास अधिकारी यु. व्ही. बागल यांनी सदर कार्यक्रमाचे सुत्र संचलन करुन शेवटी उपस्थितांचे आभार मानले.
0 Comments