माळीनगर येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन
माळीनगर (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संस्थेच्या महात्मा फुले कृषी महाविद्यालय अकलूज अंतर्गत दि. ११ डिसेंबर रोजी माळीनगर ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला.
चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या कृषीकन्या यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली महाविद्यालयाच्या वतीने येथे कृषी कार्यानुभव कार्यक्रम पुढील सहा महिने राबविण्यात येत आहे.त्या अंतर्गत कृषी दुतांनी गावातील शेतकरी बांधवांना शेतीमधील नवीन माहिती देण्यात येईल असे सांगितले आणि शेतकरी बांधवांना पारंपारिक व आधुनिक शेती बद्दल असणारा फरक तसेच नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली.
यावेळी माळीनगर ग्रामपंचायत सरपंच अनुपमा एकतपुरे, गटविकास अधिकारी कैलास सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रगतशील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमात कृषिकन्या रसिका बनसोडे,वैभवी देवकर, मानसी रक्ताटे,नेहा निकम,तनवी साडेकर,भाग्यश्री निलोगी, प्रणाली पोमण,सिद्धी लोंढे यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमास रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन नलावडे, कार्यक्रम समन्वयक एस.एम.एकतपुरे, कार्यक्रमाधिकारी एम.एम.चंदनकर, एच.डी. कल्याणी यांचे मार्गदर्शन लाभले.

0 Comments