Hot Posts

6/recent/ticker-posts

कोर्टीचे माजी सरपंच श्री.रामभाऊ मिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त कोर्टी व टाकळी येथील शाळा व अंगणवाडीतील ७५० विद्यार्थ्यांना २ वह्या ,शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप:

 कोर्टीचे माजी सरपंच  श्री.रामभाऊ मिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त कोर्टी व टाकळी येथील शाळा व अंगणवाडीतील ७५० विद्यार्थ्यांना २ वह्या ,शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप:




 कोर्टी गावचे माजी सरपंच श्री.रामभाऊ मिसाळ यांच्या ४१ या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी व कोर्टी गावातील जिल्हा परिषद  शाळा कोर्टी, टाकावस्ती, माळी वस्ती, हाकेवस्ती, येडगे- मुसलमान वस्ती, हाके-हुरे वस्ती, नेहरूनगर तसेच अंगणवाडी क्र:१, अंगणवाडी क्र:२, नेहरूनगर, माळीवस्ती, टाकावस्ती या शाळा व अंगणवाडी मधील जवळपास ७५० विद्यार्थ्यांना वह्या शैक्षणिक साहित्य व बिस्कीट पुड्यांचे यांचे वाटप करण्यात आले.
    यावेळी कोर्टी गावचे सरपंच श्री राजाभाऊ पवार उपसरपंच  मुन्ना शेख तसेच टाकळी गावचे सरपंच श्री.औदुंबर ढोणे व सरपंच श्री.समाधान देठे तसेच टाकळी व कोर्टी गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य ,मान्यवर व मित्रपरिवार तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments