स्वांतत्र्यसैनिक संपत्ती चव्हाण यांची तिसरी पिढी देशसेवेत
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक तथा नामवंत पैलवान संपत्ती चव्हाण यांची तिसरी पिढी प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे देशसेवा करताना दिसत असून नामवंत पैलवान दादासाहेब चव्हाण यांचे सुपुत्र सत्यवान चव्हाण यांची नुकतीच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर गडचिरोली येथे पदोन्नती झाल्याबद्दल तांदुळवाडी ग्रामस्थांच्या वतीने या चव्हाण परिवाराचा यथोचित सन्मान करण्यात आला.
स्वर्गीय स्वातंत्र सैनिक पैलवान संपत्तीमामा विठोबा चव्हाण हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अंगरक्षक तसेच आफ्रिका जपान पॅरिस सरकारचे वार मेडल तसेच 1972 व्या वर्षी स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिल्ली भवन येथे ताम्रपट देऊन तसेच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मंत्रालय मुंबई येथे सन्मानपत्र देऊन त्याच बरोबर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील यांनी सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले होते. देश स्वतंत्र होताना संपत्ती मामा यांनी फार मोठे योगदान दिले. आझाद हिंद सेने मध्ये संस्थापक सदस्य म्हणून रक्ताची सही करून बहुमूल्य योगदान दिले. तीन वेळा त्यांना कारावास भोगावा लागला. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत भूमिगत राहून तसेच 22 देशात त्यावेळी प्रवास केला. इंग्रजांसोबत संघर्ष ,युद्धावेळी त्यांना तीन गोळ्या पायाला लागल्या असे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पाच स्वातंत्र्यसैनिकापैकी एक तांदळवाडीतील अस्सल पैलवान ते होते.संपत मामा यांचा मुलगा पैलवान दादासाहेब चव्हाण वस्ताद यांनी अनेक कुस्तीचे फड, मैदान गाजवत नामांकित पैलवान, वस्ताद झाले.. अनेक नामांकित पैलवानावर विजय मिळवत महाराष्ट्रात 1975 ते 1984 पर्यंत नाव कमावले.
कुस्तीमध्ये त्यांची तिसरी पिढी नाव कमवत आहे.दादा वस्ताद यांची दोन्ही मुले प्रशासनात म्हणजे मोठा मुलगा सत्यवान चव्हाण पोलीस प्रशासनात तसेच लहान मुलगा बाबासाहेब चव्हाण हा कृषी विद्यापीठांमध्ये कार्यरत आहे..सत्यवान दादासाहेब चव्हाण यांनी कुस्तीमध्ये सलग बारा वर्षे नाव लौकिक कमवत 2010 साली पोलीस प्रशासनात सिलेक्शन झाले. पोलीस प्रशासनात तसेच मैदानी कुस्तीमध्ये अनेक राज्यस्तरीय पदके मिळवत तसेच नामांकित कुस्त्या जिंकत गदा, ट्रॉफी व ढाली मिळवत नावलौकिक केला..
2 डिसेंबर 2025 रोजी त्यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून गडचिरोली येथे पदोन्नती मिळाल्याबद्दल तांदुळवाडी पंचक्रोशीतील नागरिकांनी तसेच ग्रामपंचायत तांदुळवाडी व विविध मान्यवरांनी फटाक्याची आतिषबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून ते तांदूळवाडी ग्रामपंचायत पर्यंत मिरवणूक काढत सत्कार केला. त्यावेळी मल्ल सम्राट पैलवान रावसाहेब मगर यांनी उपस्थित राहून यथोचित सन्मान व सत्कार केला. त्यावेळी मल्ल सम्राट पैलवान रावसाहेब मगर यांनी चव्हाण परिवाराचा कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल मार्गदर्शन केले तसेच शशिकांत कदम, राजगुडे व बाबासाहेब चव्हाण यांनी भाषणे केली. तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सत्यवान दादासाहेब चव्हाण यांनी मनोगत लाल मातीची सेवा केल्यामुळे कुस्ती क्षेत्रातील आजपर्यंतचा प्रवास याबद्दल तसेच पोलीस प्रशासनातील गडचिरोलीतील अनुभव विषद केला त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा बद्दल तसेच भविष्यात क्रीडा क्षेत्रातील संधी याबद्दल मार्गदर्शन केले.
.png)
0 Comments