Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा मतदारसंघातील अपघातप्रवण मार्गांवर सुरक्षा उपायांची मागणी

 माढा मतदारसंघातील अपघातप्रवण मार्गांवर सुरक्षा उपायांची मागणी





अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील, अपघातप्रवण रस्त्यांवर तातडीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली.

यावेळी खासदार मोहिते-पाटील यांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील सोलापूर जिल्ह्यातील महाळुंग व माळेवाडी (बोरगाव), ता. माळशिरस या भागात वाढत असलेल्या रस्ता अपघातांची सविस्तर माहिती मंत्र्यांना दिली. श्रीपूर-महाळुंग मार्गावरील चेनज क्रमांक 116/500 ते 117/500 हा रस्ता विभाग अत्यंत अपघातप्रवण असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी सर्व्हिस रोड उभारणे व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच बोरगाव–माळेवाडी (बो) ते खंडाळी (एमडीआर-179) या मार्गावरही गंभीर अपघात घडत असल्याने, मौजे बोरगाव हद्दीतील चेनज क्रमांक 123/400 येथे अंडरपास उभारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments