सिद्धरामाच्या यात्रेसाठी आठ समित्या
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-: ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा सुरळीत अन्न शांततेत पार पाडण्यासाठी यात्रा समिती आणि त्या अंतर्गत आठ समित्या आणि ज्या-त्या समितीच्या अध्यक्षपदांच्या नावांची घोषणा पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी जाहीर केली.
मिरवणूक समितीच्या अध्यक्षपदी अॅड. मिलिंद थोबडे तर समितीवर ८ अध्यक्षपदी पुनश्च अॅड. व्ही. एस. आळंगे जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकाश बिराजदार यांच्याकडे जागा वाटप समितीची धुरा आली असून, सहा सदस्य या समितीवर कार्यरत राहणार आहेत. शोभेच्या दारूकाम समितीच्या यांची निवड झाली असून, सहा सदस्य त्यांच्या दिमतीला राहणार आहेत.
प्रचार अन् प्रसिद्धी समिती प्रा. राजशेखर येळीकर हॅन्डल करणार असून, या समितीवर सहा जण कार्यरत असणार आहेत. प्रसाद वाटप समितीची जबाबदारी रतन रिक्के यांच्यावर आली असून, पाच सदस्य त्यांच्या कामास गती देणार आहेत. रंग आणि विद्युत रोषणाई समितीचे प्रमुख काम शिवकुमार, पाटील पाहणार असून, त्यांनाही पाच जणांची साथ मिळणार आहे. जनावरांचा बाजार
कृषी प्रदर्शन समिती पुनश्च माळगेंकडे
दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर कृषी प्रदर्शन भरते. यंदाही २५ ते २९ डिसेंबरपर्यंत हे राज्यस्तरीय प्रदर्शन होम मैदानावर भरणार असून, आजपर्यंत कृषी प्रदर्शन यशस्वी करणारे गुरुराज माळगे यांच्याकडे पुनश्च कृषी प्रदर्शन समितीचे अध्यक्षपद देण्यात आल्याचे धर्मराज काडादी यांनी सांगितले.
समितीच्या अध्यक्षपदी नीलकंठप्पा कोनापुरे यांची नियुक्ती झाली आहे.
0 Comments