Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी शिक्षण संस्थेत आजपासून तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमाला

 नेताजी शिक्षण संस्थेत आजपासून तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमाला






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संस्थेत आज बुधवार दि.१७ डिसेंबर ते शुक्रवार दि.१९ डिसेंबर पर्यंत सांय सहा वाजता श्री तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि.१७ डिसेंबर रोजी इंद्रजित देशमुख (कराड )हे 'सुजाण पालकत्व' या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत. देशमुख हे महाराष्ट्रातील नामवंत प्रभावी, समाज प्रबोधनकार व विचारप्रवर्तक म्हणून ओळखले जातात.गुरुवार दि.१८ रोजी जितेंद्र आसोले (गोंदिया) हे 'माणूस म्हणून जगताना' या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत.आसोले हे ओघवत्या भाषा शैलीतून प्रेरणादायी विचार मांडणारे व्यक्ते आहेत तर शुक्रवार दि.१९ रोजी महांतेश हिरेमठ (विजयपूर) हे 'गुरु महात्म्य' या विषयावर कन्नड भाषेतून शेवटचे तिसरे पुष्प गुंफणार आहेत. मठपती हे कर्नाटक राज्यातील वेद व अध्यात्माचे अभ्यासक तसेच सांस्कृतिक प्रबोधन करणारे प्रभावी प्रवचनकार आहेत.तरी श्रोत्यांनी व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments