महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी भवनात इच्छुकांची उसळली गर्दी
१२२ इच्छुकांनी घेतले उमेदवारी अर्ज
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगळवारपासून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात झाली.पहिल्याच दिवशी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात इच्छुक उमेदवारांच्या गर्दीने प्रचंड प्रतिसाद मिळाला.
माजी महापौर, माजी उपमहापौर तसेच ५ माजी नगरसेवकांसह १२२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज
घेतले.
काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते व माजी महापौर मकबूल मोहोळकर यांनी प्रभाग क्रमांक १४ साठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे यांनी प्रभाग क्रमांक १२ साठी उमेदवारी अर्ज घेतला. तर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रभाग क्रमांक २२, माजी ज्येष्ठ नगरसेवक तौफिक शेख यांनी प्रभाग २०, सिद्धेश्वर आनंदकर यांनी प्रभाग १ साठी तसेच माजी नगरसेविका नूतन गायकवाड यांनी प्रभाग १७, तसेच तस्लीम शेख यांनी प्रभाग क्रमांक २० साठी,राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संगीता जोगदनकर यांनी प्रभाग २६ साठी तसेच माजी नगरसेवक तौफिक शेख यांचे चिरंजीव अदनान शेख यांनी प्रभाग क्रमांक १६ साठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांनी अर्ज घेतल्यानंतर काहींनी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्याकडे अर्ज सुपूर्द केले आहेत. कलीम तुळजापूर यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज घेतला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर - जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रा. श्रीनिवास कोंडी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले तसेच महिला शराध्यक्षा संगीता जोगदनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम यांच्यासह माजी महापौर मकबूल मोहोळकर, माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे,बसवराज बगले ,माजी नगरसेवक तौफिक शेख, फारूक मटके ,युवकचे कार्याध्यक्ष तुषार जक्का, सनी देवकते,विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत व्हसुरे,सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव,सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे, व्हीजेएनटी सेल विभाग अध्यक्ष रुपेशकुमार भोसले, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भरत साबळे, सांस्कृतिक नाट्य विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे,कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, संघटक सचिन चलवादी , ओबीसी सेल विभाग कार्याध्यक्ष आयुब शेख, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे,कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर, श्यामराव गांगर्डे , महेश गाडेकर, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, यांच्यासह नेतेगन प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
================== राष्ट्रवादी भवनात
इच्छुकांची लगबग
====================
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अबकी बार ७५ पार चा नारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण १०२ जागेवर उमेदवार उभे करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांची अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. यामध्ये पुरुषांबरोबर इच्छुक असणाऱ्या महिलांचाही मोठा समावेश दिसून आला. युवा वर्गांनी सुद्धा इच्छुक उमेदवारीसाठी मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. यासाठी राष्ट्रवादी भवन सज्ज ठेवण्यात आले होते.
===================
जंगी स्वागत आणि रेड कार्पेट
=================== अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांना तितकाच सन्मान दिला जातो. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी उमेदवारीसाठी येणाऱ्या इच्छुकांसाठी राष्ट्रवादी भवनाच्या पायऱ्यांवर रेड कार्पेट टाकले होते. तर स्वागतासाठी ढोल आणि ताशा सज्ज ठेवला होता. वाजत गाजत सर्व इच्छुकांचे राष्ट्रवादी भवनात आगमन होत होते. राष्ट्रवादी भवनात पहिल्या पायरी पासून ते पहिल्या मजल्यावरील भवनापर्यंत रेड कार्पेट टाकण्यात आल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे तसेच उत्साहाचे वातावरण दिसून आले. कोणताही गडबड किंवा गोंधळ न होता,पहिल्या दिवशीचा उमेदवारी अर्जाचा टप्पा मंगळवारी मोठ्या जल्लोषात पार पडला. ==================
सक्षम उमेदवार मैदानात !
=================
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना सोलापूरचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे तसेच सहसंपर्क प्रमुख व विधानसभा उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे यांचे संपूर्ण मार्गदर्शन व ताकद मिळणार असून पक्षाकडून “आपकी बार ७५ पार” हा आक्रमक नारा देण्यात आला आहे. “सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सक्षम, स्वच्छ प्रतिमेचे व जनतेशी जोडलेले उमेदवार मैदानात उतरवत आहे, असे शहर - जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे व विधानसभा उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली ‘आपकी बार ७५ पार’ हे लक्ष्य निश्चितच साध्य होईल.”पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने सज्ज झाल्याचे जिल्हाध्यक्ष पवार यांनी सांगितले.
.png)
0 Comments