भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी महाआघाडीचा निर्णय- आडम मास्तर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेतून भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी महाआघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शहरातील पाच पक्ष सहभागी होणार आहे. विजयी होण्याच्या निकषावर जागा वाटप सहभागी पक्षामध्ये होणार आहे. माकपा सात प्रभागत आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा महाआघाडीचे प्रवक्ते, माजी आमदार आडम मास्तर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
महाआघाडीमध्ये कॉग्रेस, माकपा, राष्ट्रवादी शरद पवार यांचा गट, उबाठा सेना आणि मनसे असे पाच पक्ष सध्या सहभागी आहेत. इतर समविचारी पक्षांना महाआघाडीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आडम मास्तर यांनी केले आहे. गेल्या पाच वर्षात भाजपने सोलापूर शहराचे वाटोळे केले आहे. स्मार्ट सिटी योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे केल्याचा दावा केला जात आहे. मात्र आज शहरात सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. ड्रेनेज, रस्ते, यासह अनेक समस्या आहेत. हे प्रश्न सोडवण्यास भाजपाला अपयश आले आहे. त्यामुळे भाजपाला पुन्हा सत्तापासून दूर ठेवण्यासाठी
महाआघाडीची स्थापना केली गेली आहे. या संदर्भात पाच बैठका झाल्या आहेत.
निवडून येण्याच्या निकषवार जागा वाटप केले जाणार आहे. माकपाने २० जागांची मागणी केली आहे. प्रभाग क्रमांक ९, १३,१४,१५,१६,१८,२२ या सात प्रभागात माकपाचे उमेदवार उभे केले जाणार आहेत. उमेदवारांची यादी फायनल झाली आहे. माकपाने यंदा ५० टक्के तरुणांना संधी दिली जाणार असल्याचे आडम मास्तर यांनी गो सांगितले. महाआघाडीची सत्ता आल्यानंतर प्रत्येक पक्षांचा महापौर होण्याचा मान मिळणार आहे. त्यामुळे यंदा माकपाचा महापौर होण्याची संधी आहे. महाआघाडी होणे काळाजी गरज आहे. अन्यथा पराभव अटळ असल्याचे आडम मास्तर यांनी जाहीर केले.
या पत्रकार परिषदेस कॉ. एम.एच. शेख, नलिनी कलबुर्गी, कामिनी आडम, व्यंकटेश कोंगारी, अँड. अनिल वासम, सुनंदा बल्ला, नसिमा शेख यांची उपस्थिती हाती.
.png)
0 Comments