Hot Posts

6/recent/ticker-posts

निवडणूक पूर्वतयारीसाठी निवडणूक संनियंत्रण समितीची बैठक संपन्न

 निवडणूक पूर्वतयारीसाठी निवडणूक संनियंत्रण समितीची बैठक संपन्न




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक माहे डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत होणार असून, या निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत मा. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने प्रभावी नियोजन करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी, निवडणूक खर्चावर नियंत्रण, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे तसेच मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या रोख रक्कम, दारू व भेटवस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

या अनुषंगाने आयुक्त तथा  निवडणूक अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक संनियंत्रण समितीची बैठक दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत निवडणूक काळातील विविध विभागांच्या जबाबदाऱ्या व समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकिस एम. राजकुमार — पोलीस आयुक्त,प्रा. पी. ए. महानराव — कुलगुरू,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सौ. वीणा पवार — अतिरिक्त आयुक्त, संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त विजय काबाडे — उपायुक्त पोलीस, एस. एम. पडदुणे — उप विभागीय अधिकारी,आशिष लोकरे उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील — उपायुक्त पोलीस,सह आयुक्त गिरीष पंडित सौ. वैष्णवी पाटील — पोलीस निरीक्षक प्रदीप मोरे — सहाय्यक कार्यकारी अभियंता, महावितरण मनीष एम. एम. — जीएसटी अधिकारी, विशालकुमार — आयकर अधिकारी, सोलापूर,प्रवीण दंतकाळे नगर सचिव सोलापूर महानगरपालिका संजीव कुमार — विभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, जगन्नाथ पाटील — निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग आदी मान्यवर उपस्थिती होते.बैठकीत पोलीस आयुक्त कार्यालयाच्या जबाबदाऱ्यांवर विशेष भर देण्यात आला. निवडणूक काळात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे, निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवणे व आर्थिक बळाचा गैरवापर रोखणे ही पोलीस विभागाची प्रमुख जबाबदारी राहणार आहे.मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी रोख रक्कम, दारू, भेटवस्तू तसेच अन्य प्रलोभनात्मक वस्तूंच्या वाटपावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. यामध्ये संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे, तपास नाके उभारणे, गुन्हे नोंद (FIR), जप्तीची कार्यवाही तसेच निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात येईल तसेच निवडणूकीच्या दरम्यान श्री सिद्धरामेश्वर यात्रा होणार असून महापलिका सोबत समन्वयाने काम करू अशी माहिती पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सागितलं
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी
रोख व बेहिशेबी आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणे, तपास, शोध व जप्तीची कार्यवाही करणे, निवडणूक खर्च नियंत्रणास सहाय्य करणे व निवडणूक यंत्रणेशी समन्वय साधून अहवाल सादर करणे.विक्रीकर उपायुक्त (GST)यांनी बेहिशेबी वस्तू व करचुकवेगिरीवर कारवाई, निवडणूक खर्चाशी संबंधित व्यवहारांवर लक्ष ठेवणे, जप्ती, दंड व तपासाची कार्यवाही तसेच निवडणूक यंत्रणेशी समन्वय व अहवाल. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू वाटप व बेकायदेशीर विक्री रोखणे, परवाना धारकांवर नियंत्रण, जप्ती, गुन्हे नोंद व परवाना संबंधित कारवाई, तसेच निवडणूक यंत्रणेशी समन्वय व अहवाल.शहरतील सर्व बँकानी मोठ्या रोख व्यवहारांवर लक्ष ठेवणे व निवडणूक यंत्रणेशी समन्वय साधून आवश्यक अहवाल सादर करणे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी निवडणूक कर्तव्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे तसेच निवडणूकविषयक जाहिरात व सहकार्य करावे
सार्वजनिक बांधकाम विभाग निवडणूक काळात नवीन कामे व उद्घाटनांवर बंदी, शासकीय संसाधनांचा गैरवापर रोखणे, केवळ देखभाल व आपत्कालीन कामे सुरू ठेवणे तसेच निवडणूक सुविधांसाठी सहकार्य व अहवाल. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाने मतदान व मतमोजणी कालावधीत अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करणे, संसाधनांचा गैरवापर रोखणे व निवडणूक यंत्रणेशी समन्वय.उप प्रादेशिक परिवहन विभागाने प्रचारासाठी वाहनांचा गैरवापर रोखणे, वाहनांची कागदपत्रे व परवाने तपासणे, रॅली व सभांसाठी वाहतूक नियमन, निवडणूक खर्च नियंत्रणास सहाय्य व समन्वय.नगरसचिव यांनी
आचारसंहिता पालन व प्रशासकीय तटस्थता राखणे, ठराव व निर्णयांवर नियंत्रण, शासकीय संसाधनांचा गैरवापर रोखणे तसेच निवडणूक यंत्रणेस आवश्यक ते सहकार्य व अहवाल सादर करणे.

बैठकीत सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यात येईल मा. आयुक्त तथा  निवडणूक  अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले. नागरिकांनीही आचारसंहितेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Reactions

Post a Comment

0 Comments