Hot Posts

6/recent/ticker-posts

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

 शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त व शरदचंद्र पवार प्रशाला सोलापूर या शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शरद सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती माजी महापौर मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
          शुक्रवार, दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शरद बँक लकी चौक सोलापूर येथे रक्तदान शिबीर होणार आहे. शनिवार, दि. 13 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता शरदचंद्र पवार प्रशाला येथे होम मिनिस्टर स्पर्धा होणार आहे. रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता बचुटे महाराज उद्यान, दमाणीनगर, सोलापूर येथे होम मिनिस्टर स्पर्धा होणार आहे. सोमवार, दि. 15 डिसेंबर रोजी शरदचंद्र पवार प्रशाला येथे दुपारी तीन वाजता क्रीडा सप्ताहाला सुरुवात होणार आहे. याशिवाय वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
          या पत्रकार परिषदेला ज्ञानेश्वर सपाटे, प्रा. महेश माने, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments