गुन्हे शोधक श्वान कायरा सेवानिवृत्त
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शोध शाखेत (Crime Detection Branch) अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा, अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करणारा आणि तपासात पोलिसांना मोठी मदत करणारा श्वान पथकातील कायरा श्वान हा अखेर 10 वर्षांची (मानवी वर्षानुसार) उत्कृष्ट सेवा पूर्ण करून निवृत्त झाला आहे.
दि. ०९/१२/२०२५ रोजी कायराला सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. कायराने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल करून दाखवली आहे.
सन २०१९ मध्ये विजापूर रोड सोरेगाव येथे प्रसिध्द असलेले गजानन महाराज मंदिरामध्ये चोरी झालेली होती. त्याअनुषंगाने विजापूर नाका पो. ठा. गुरनं ३३/२०१९ भा.द.वि.क. ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल होता. सदर मंदिराचे घटनास्थळी गुन्हे शाखेकडील श्वान कायरा व पथक यांना पाचारण केले. त्यावेळी हँडलर पोह/४२० दोरनाल यांनी मंदिरास लावण्या आलेले व चोरांनी तोडलेल्या कुलुपचा वास दिला. त्यावेळी कायरा श्वानाने गजानन मंदिरा पासून ५०० मिटर अंतरावर जावून एका मोकळ्या जागेच्या ठिकाणी जावून थांबले. त्याअनुषंगाने विजापूर नाका पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदारांनी त्या जागेचे सूक्ष्म निरीक्षण केले. त्यानुसार सदर ठिकाणाहून आरोपींचे मिळून आलेल्या वस्तूंवरून नमूद प्रमाणे दाखल चोरीचा गुन्हा उघडकीस आला होता. त्याप्रमाणे तत्कालीन बापू बांगर पोलीस उप-आयुक्त गुन्हे यांनी श्वान कायरा व हँडलर पोह/४२० दोरनाल व पोह/४३० गवंडी यांना बक्षीस दिले होते.
२) सन २०२२ मध्ये एम आय डी सी परिसरात मर्डरचा गंभीर गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार एम आय डी सी पोलीस ठाणे गुरंनं ५२९/२०२२ भा.द.वि.क.३०२ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. नमूद घटनास्थळावरून संशयीत आरोपीची चप्पल जप्त करणेत आली होती. त्यानंतर एम आय डी सी पोलीस ठाणे येथे ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपींना उभे करून त्यांची कायरा श्वानाद्वारे ओळख परेड घेण्यात आली होती. ओळख परेड दरम्यान सापडलेल्य चप्पलचा वास कायरा श्वानास देण्यात आला होता. त्याआधारे कायरा श्वानाने आरोपीची ओळख पटविली.
३ ) अशाच प्रकारे श्वान कायराने मालाविषयक व शरिराविषयक बऱ्याच गुन्ह्यांची उकल होणेकामी मदत केली आहे.
सदर सेवानिवृत्ती कार्यक्रमास एम राज कुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, गौहर हसन पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय), विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), डॉ. अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), राजन माने सहायक पोलीस आयुक्त गुन्हे, अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा तसेच श्वान पथकाचे पोलीस अंमलदार स. फो. लक्ष्मण गणगे, स. फो. शिवानंद कलशेट्टी, पोह/श्रीकांत दोरनाल, पोह/संतोष गवंडी, पोह/संतोष आळंद, पोह/मोहसिन शेख, पोह/निलेश कारभारी, पोह/राजू राठोड, पोह/स्वामीराज बिराजदार व पोकों/अनंत कोकरे आदी उपस्थीत होते.
.png)
0 Comments