Hot Posts

6/recent/ticker-posts

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भरीव निधीच्या ठोस आश्वासनामुळे मोहोळमध्ये भाजपाची सकारात्मक सरशी

 पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भरीव निधीच्या ठोस आश्वासनामुळे मोहोळमध्ये भाजपाची सकारात्मक सरशी





मोहोळ शहराला जिल्ह्यातील सर्वाधिक विकसित शहर बनविण्यासाठी भाजपा हाच सक्षम पर्याय : शितल क्षीरसागर


मोहोळ (कटूसत्य वृत्त):-

मोहोळ नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये पहिल्या दिवसापासून विकासाच्या मुद्द्यावर अग्रेसर असलेल्या भारतीय जनता पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल सुशील क्षीरसागर यांनी आपल्या प्रचाराचा अंतिम टप्पा आता यशस्वीरित्या पुर्ण केला आहे. ज्येष्ठ मार्गदर्शक नागनाथभाऊ क्षीरसागर संजय अण्णा क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर यांच्या समवेत मोहोळ नगरपरिषद निवडणुकीचे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रभारी सुशीलभैया क्षीरसागर यांनी शितल क्षीरसागर यांच्यासह भाजप पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ अत्यंत सक्षम अशी प्रचार यंत्रणा सक्रिय ठेवत या प्रचारामध्ये निर्णायक आघाडी घेतली आहे. 

देशात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे सरकार गौरवास्पद कामगिरीने संपूर्ण जगात नावलौकिक प्राप्त करत आहे. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यशस्वीरित्या इन्फ्रा मॅनची भूमिका सार्थपणे निभावत पुढील पन्नास वर्षाच्या महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीची पायाभरणी केली आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात सक्षम सरकार असलेल्या भाजपच्या विकास प्रवाहात मोहोळ शहराचाही समावेश व्हावा. भरीव निधीतून मोहोळच्या सर्वांगीण विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत. यासाठी मोहोळ नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकणे आवश्यक आहे. ही महत्वपूर्ण बाब अत्यंत प्रभावीपणे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल क्षीरसागर यांनी सर्वांसमोर मांडले आहे त्यामुळे आपले मत वाया जाऊ नये या उदात्त भावनेतून शहरवासी यांनीही शितल क्षीरसागर यांनाच मतदान करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. 

यापूर्वी भाजप नगरसेवक असलेल्या सुशील भैय्या क्षीरसागर यांनी त्यांच्या प्रभाग सोळा मध्ये साडे आठरा कोटीपेक्षा जास्तीच्या निधीची दर्जेदार विकासकामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात सर्वाधिक विकसित प्रभाग म्हणून या प्रभागाला विशेष नावलौकिक मिळवून दिला आहे. त्यामुळे विकास कसा करावा तर तो सुशील भैय्या यांच्या प्रभागासारखा असावा याबाबत शहरवासीयांना त्यांच्या कार्यक्षमतेची खात्री झाली. प्रभाग सोळाच्या धर्तीवर संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या धोरणातून शहरवासीयांना भाजपाकडून विकासाच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजपा सोबतच राहण्याचा शहरवासीयांचा पक्का निर्धार झाला आहे. 
सर्वसमावेशक व्यक्तिमत्व असलेल्या सुशील यांच्या मनमिळाऊ आणि कार्यक्षम स्वभावामुळेच भारतीय जनता पक्षाने सर्वानुमते त्यांच्या सुविद्य पत्नी असलेल्या शीतल क्षीरसागर यांच्या माध्यमातून नगरपरिषद निवडणुकीत एक सुशिक्षित आणि युवा चेहरा मैदानात उतरविला आहे. ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अविरत परिश्रम घेत या प्रचारामध्ये निर्णायक आघाडी घेतली आहे.

चौकट
मोहोळ शहराच्या पुढील पन्नास वर्षातील विकासात्मक जडण घडणीसाठी भाजपाची साथ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री तथा राजकीय मार्गदर्शक ना. जयकुमार भाऊ गोरे यांनी अंतर्गत रस्त्यासाठी ४०० कोटींचा, मोहोळ मधील मेन रोड साठी १२ कोटींचा तर सीसीटीव्हीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन जाहीर प्रचार सभेत दिले आहे. या पुढील काळात आपल्या मोहोळ शहराला जिल्ह्यातील सर्वाधिक प्रगत आणि सोयी सुविधायुक्त असलेले विकसित शहर म्हणून ओळख देण्यासाठी माझा प्रयत्न असेल.
त्यामुळे मोहोळ शहरवासीयांनी माझ्यासह भारतीय जनता पक्षाच्या सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करत मोहोळच्या
सर्वांगीण प्रगतीसाठीचे शिल्पकार व्हावे.

शितल क्षीरसागर 
नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार

Reactions

Post a Comment

0 Comments