Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी प्रशालेत महापरिनिर्वाण दिन साजरा

 नेताजी प्रशालेत महापरिनिर्वाण दिन साजरा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ६९ वी महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. प्रथम मुख्याध्यापक रविशंकर कुंभार व पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्नेहा स्वामी, प्रतीक्षा हंचाटे, अंजली तावस्कर, दिव्या करबट्टी, अलैक्या कोंतम, मुजरीन मुल्ला, आरोही काशीद, श्रीनिधी वडीशेरला, भाग्यश्री दावणे, स्वप्नील स्वामी, अभिप्रिया राजुल ,कीर्ती चोळके आदी विद्यार्थ्यांनी भाषणातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितले.यावेळी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार म्हणाले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक जीवन प्रवास खूप खडतर होता. प्रतिकूल परिस्थितीत असताना अठरा-अठरा तास वाचन,मनन, चिंतन करुन अभ्यास केला.आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेच्या जोरावर पुढे बॅरिस्टर बनले.अनेक देशांचे संविधान अभ्यासून भारताला मजबूत लोकशाही असण्यासाठी त्यांनीच भारताची राज्यघटना लिहिले.पर्यवेक्षक आळंगे म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे गोरगरीब जनतेचे कैवारी, दिन दलितांचे महामेरू, बहुजन समाजाचे ते आधारवड होते. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात शिक्षण व्यवस्थेत अडचणी होत्या त्या अडिअडचणीवर मात करून उच्च विभूषित होवून कर्तृत्व सिद्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद पुजारी यांनी केले तर राजेंद्र मुलगे यांनी आभार मानले.


Reactions

Post a Comment

0 Comments