Hot Posts

6/recent/ticker-posts

नागनाथ विद्यालय सुंदर शाळामध्ये तृतीय

 नागनाथ विद्यालय सुंदर शाळामध्ये तृतीय
पोखरापूर(कटूसत्य वृत्त):-  राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा ०.२ अंतर्गत २०२२ - २३ मध्ये झालेल्या नागनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, मोहोळ स्पर्धेत मोहोळ येथील नागनाथ विद्यालयाने तालुक्यातून तृतीय क्रमांक मिळवत एक लाख रकमेचे रोख पारितोषिक पटकाविले. सन १९५० मध्ये स्थापन झालेली ही शाळा अत्यंत जुनी अशी शिक्षण संस्था आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रात ही या शाळेने राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करून सर्व क्षेत्रांमध्ये विद्यार्थी पाठविण्याचे काम या शाळेमुळे झाले. मुख्याध्यापक बी. एन. बागवान म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर सर्व शिक्षक व विद्यार्थांनी सर्वच टप्पे पार करत यश मिळविले. या पारितोषिकाची रक्कम पंचायत समितीकडून शाळेकडे नुकतीच जमा झाली आहे. संस्थेचे प्रशासक तथा जिल्हा सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी विद्यालयाचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या शिरपेचात या पुरस्कारामुळे मानाचा तुरा खोवला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments