Hot Posts

6/recent/ticker-posts

हॉटेल मॅनेजर मारहाण प्रकरणात रिलस्टार लखन मानेचा जामीन फेटाळला

 हॉटेल मॅनेजर मारहाण प्रकरणात रिलस्टार लखन मानेचा जामीन फेटाळला



 

7777 हॉटेलचे मालक न्यायालयीन कोठडीत
टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):-
 सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी बायपासजवळील *7777 हॉटेल* चे मालक आणि “रील स्टार” म्हणून ओळखले जाणारे लखन हरिदास माने यांना हॉटेल मॅनेजरवर अमानुष मारहाणीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात माने यांनी दाखल केलेला जामीन अर्ज माढा न्यायालयाने फेटाळला असून, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत.  

टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, माने यांनी तीन महिन्यांपूर्वी हॉटेल मॅनेजर निवास नकाते यांच्यावर अत्यंत निर्दयपणे अत्याचार केला होता. मॅनेजरला कपडे काढून नग्न अवस्थेत लोखंडी पाइपने मारहाण करत शिवीगाळ करण्यात आल्याचा व्हिडिओ अलीकडेच सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर संतापाची लाट उसळली आणि पोलीसांनी तातडीने कारवाई केली.  
घटनेबाबत मॅनेजर निवास नकाते यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पोलीस हवालदार शिवाजी जाधव व पोलीस नाईक केशव झोळ यांच्या पथकाने चौकशी करून लखन मानेला अटक केली. मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कुलकर्णी यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.  
या घटनेमुळे टेंभुर्णी परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments