छत्रपती शिवरायांचा पराक्रम प्रेरणादायी- श्रीकांत डांगे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छोट्या-मोठ्या संकटाने हतबल होणाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा प्रेरणादायी धडा आहे. जेव्हा अफजलखानासारखे संकट समोर उभे राहते, तेव्हा त्याचा पराभव कसा करायचा, याचा वास्तुपाठ शिवरायांनी आपल्याला घालून दिला, असे प्रतिपादन संभाजी आरमारचे प्रमुख श्रीकांत डांगे यांनी केले.
शिंदे चौक येथील शिवस्मारक येथे शिवप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास संभाजी आरमारतर्फे डांगे यांच्यासह आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, सागर ढगे, शशिकांत शिंदे, गजानन जमदाडे, मनीष काळे, अमित कदम, ज्ञानेश्वर डोंबाळे, सागर दासी, सोमनाथ मस्के, प्रदीप मोरे, सुधाकर करणकोट, अविनाश विटकर, सागर घाडगे, अर्जुन शिवसिंगवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
डांगे म्हणाले, बलाढ्य अफजलखानाला संपवणे हे अशक्यप्राय कार्य होते. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धी, चातुर्य आणि पराक्रमाच्या बळावर हा पराक्रम साध्य केला. जागतिक युद्धशास्त्रातही शिवरायांच्या या अनोख्या युद्धकौशल्याची नोंद घेण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, संभाजी आरमारतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवरायांच्या या पराक्रमाचे स्मरण करून मानवंदना देण्यात आली. त्यावेळी शिवस्मारक परिसरात देण्यात आलेल्या 'जय भवानी, जय शिवाजी' च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता..
या कार्यक्रमास बाळासाहेब वाघमोडे, द्वारकेश बबलादीकर, निहाल शिवसिंगवाले, प्रवीण मोरे,
सुरेश मामड्याल, राज जगताप, सुरेश सुंदाळम, रोहन तपासे, पिंटू आणि सुमित औरंगे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments