खा. धनंजय महाडिक यांनी शब्द पाळला; अतिरिक्त ₹१०० शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
कुरुल (कटूसत्य वृत्त):- भीमा मल्टिस्टेट सहकारी साखर कारखान्याने २०२४-२५ हंगामातील उसासाठी प्रति टन ₹२९०० रु प्रमाणे बील जमा करण्यात आले असून , हा मोहोळ तालुक्यातील सर्वाधिक दर आहे.
गेल्या हंगामाच्या सुरुवातीस खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी गळितास आलेल्या ऊसाचा २८०० रु. प्रति टन असा जाहीर केला होता. वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त ५० रु.प्रति टन देण्याचे वचन दिले होते. तसेच, ज्या शेतकऱ्यांचे ऊस बिले हंगामाच्या अखेरीस प्रलंबित होती, त्यांना अतिरिक्त ५० रु प्रति टन, असे एकूण ₹१०० दरवाढीचा लाभ दिला आहे.
तसेच दिलेले वचन महाडिक पिता - पुत्रांनी पाळत गळीत हंगाम २०२४- २५ मध्ये गाळपास आलेल्या उसाला दि- ३०/११/२०२४ ते १५/०१/२०२५ मधील उसास अतिरिक्त ५० रु प्रति टन व दि- १६/०१/२०२५ ते ०३/०२/२०२५ मधील उसास अतिरिक्त १०० रु प्रति टन प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे या निर्णयामुळे भिमा कारखान्याने शेतकऱ्यांचा विश्वास दृढ केला असून, शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
भिमा मल्टिस्टेट सहकारी साखर कारखाना नेहमीप्रमाणेच शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी वचनबद्ध आहे आणि आगामी हंगाम अधिक यशस्वी ठरेल असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
चौकटशेतकरी हाच भीमा परिवाराचा केंद्रबिंदू आहे. माननीय खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेतकऱ्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देतो. इथेनॉल प्रकल्प नसतानाही उपपदार्थ निर्मिती करणाऱ्या कारखान्यापेक्षाही जास्त ऊस दर देण्याची आमची परंपरा आम्ही यंदाही कायम ठेवली. मोहोळसह संपूर्ण भीमा कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला, त्याचे हे दराच्या रूपाने दिलेले प्रतिफळ आहे. शेतकऱ्यांनी आपला ऊस भीमाला देऊन आम्हाला सहकार्य करावे, अशी आमची नम्र विनंती आहे. आम्ही या चालू हंगामातही सर्वाधिक दर देण्यासाठी कटिबद्ध राहू.
विश्वराज महाडिक
चेअरमन- भीमा सहकारी साखर कारखाना


0 Comments