छत्रपती ब्रिगेडच्या वतीने शिवप्रताप दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती ब्रिगेडच्या वतीने 10 नोव्हेंबर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हद्दवाढ भागातील शिवप्रताप चौक येथील शिव प्रताप चौक या नामफलकास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानास ठार मारून स्वराज्यावर आलेले मोठे संकट छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या युक्तीने व पराक्रमाने परतवून लावले त्यामुळे जनमानसात असामान्य असा आत्मविश्वास व स्वाभिमान जागृत झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमाचे स्मरण म्हणून हा शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी छत्रपती ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके विकास बचुटे, प्रवीण सोमवंशी, नितीन गायकवाड, ज्ञानेश्वर पवार, गणेश वर्डे, धर्मा माने,सीताराम बाबर, श्रीनिवास कोळी, तुळशीराम राठोड, आकाश चव्हाण, गौरीशंकर वरपे, श्रवण साळुंखे, धनराज गायकवाड, रावसाहेब प्रक्षाळे महेश तेलूर आदी उपस्थित होते.
.png)
0 Comments