अकलूज पोलीस ठाण्यात 10 खासगी सावकरांवर गुन्हा दाखल
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलुज मधील १० सावकारी करणा-या व्यक्तीवर, अकलुज पोलीस ठाणे सावकारी कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अकलूज पोलीस ठाण्याकडून देण्यात आली.
अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
फिर्यादी मुनावर गुलमहंमद खान वय ४८ वर्षे धंदा राईस (भाताचा) गाडा रा. जुना बाजारतळ अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर यांने सन २०२१ पासुन ते वेळोवेळी तसेच दिनांक ०६/११/२०२५ रोजी हे घरी झोपले असताना, खाजगी सावकार सिध्दार्थ पवार हा फिर्यादीचे घरी येवुन गोंधळ करू लागला. तसेच आरोपी सिध्दार्थ पवार याने फिर्यादीस आई बहिणीवरून शिवीगाळी करून, मुददल व व्याजाचे पैसे एका तासामध्ये पाहिजेत व पैसे नाही दिलेतर वाईट होईल अशी धमकी दिली व फिर्यादीची पत्नी व मुलांना देखील त्यांचे अंगावर धावुन जावुन शिवीगाळी केली. त्यामुळे खाजगी सावकार आरोपी अनिल मदने रा. महादेवनगर अकलुज ता. माळशिरस, सिद्धार्थ पवार रा. अकलुज ता. माळशिरस, मनोज साळुंखे रा. अकलुज ता. माळशिरस, भैय्या दत्तात्रय जगदाळे रा. सराटी ता. इंदापुर जि. पुणे,गुरु पवार रा. लोणारगल्ली अकलुज ता. माळशिरस, सोनु मोहीते रा. संग्रामनगर ता. माळशिरस, गौरख माने रा. मळोली ता. माळशिरस, अवधुत शेंडगे रा. वेळापुर ता. माळशिरस, सचिन खिलारे रा. अकलुज ता. माळशिरस, १०) विलास मारकड रा. खुडुस ता. माळशिरस यांच्या रोजच्या त्रासाला कंटाळुन फिर्यादी यांनी दिनांक ०६/११/२०२५ रोजी दुपारी १२/१५ वाचे सुमारास नविन एस. टि. स्टॅन्ड समोर बागेत बुटेक्स नावाचे विषारी औषध पिले व तेथेच बेशुध्द पडले असता, त्यांचे ओळखीचे लोकांनी फिर्यादी यांचे घरी सांगितल्यावर फिर्यादीच्या मुलाने फिर्यादीस उपचाराकरीता अकलुज येथील अपेक्स हॉस्पिटल येथे दाखल केले होते. दिनांक ९/११/२०२५ रोजी फिर्यादी हे शुध्दीवर आल्यानंतर त्यांचा अपेक्स हॉस्पीटल येथे जबाब नोंद करुन त्यांनी वरील नमुद आरोपी विरुध्द फिर्याद दिल्याने गु.र.नं. व कलम ७३०/२०२५ BNS कलम ३५१ (२), ३५१(३), ३५२, ३२४(४), ३(५) महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९, ४५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपीचा त्यांचे राहते घरी शोध घेतला असता मिळून आलेले नाहीत ते गुन्हा दाखल झाल्यापासुन परागंदा झालेले आहेत. त्याच्याबाबत काही माहिती मिळताच अकलुज पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा तसेच वरील आरोपी बाबत व इतर खाजगी सावकारीची तक्रार असल्यास अकलुज पो. ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन अकलुज पोलीस ठाणे यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
.png)
0 Comments