Hot Posts

6/recent/ticker-posts

अवधूत चव्हाण याची जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी निवड

 अवधूत चव्हाण याची जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी निवड




माढा (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद सोलापूर व कुर्डूवाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी टॅलेंट हंट अर्थात विद्यार्थी गुणवत्ता शोध स्पर्धेतंर्गत माढा येथील मुलींच्या केंद्र शाळेत घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत अंजनगाव खेलोबा केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबोळी-वस्ती शाळेतील चौथीचा विद्यार्थी अवधूत संतोष चव्हाण याने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.त्याची मंगळवेढा येथे होणा-या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक किरण रोकडे यांनी दिली आहे.

या चित्रकला स्पर्धेत माढा तालुक्यातील 21 बीटमधून 28 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.श्री खेलोबा विद्यालयाचे मुख्याध्यापक मारुती शिंदे यांनी परीक्षक म्हणून कामकाज पाहिले.अवधूत चव्हाण याने अतिशय सुंदर व आकर्षक पद्धतीने निसर्गचित्र काढले होते. त्यास आई स्वप्नाली चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे.तो दारफळ सीनाचे उपक्रमशील शिक्षक संतोष चव्हाण यांचा मुलगा आहे.

यावेळी प्रभारी विस्ताराधिकारी फिरोज मनेरी, केंद्रप्रमुख सुरेश माळी,गट साधन केंद्राचे प्रविण भांगे,विषयतज्ञ प्रविण सानप, विनोद परिचारक,विजय काळे,चारुदत्त आष्टेकर,संदीप काशीद यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments