Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात पाच महिन्यांचे सीडीआर मागवण्याचे आदेश

 डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात पाच महिन्यांचे सीडीआर मागवण्याचे आदेश





सोलापूर (कटूसत्य वृत):- प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात नवे वळण आले असून, न्यायालयाने डॉ. वळसंगकर कुटुंबियांसह सात जणांचे पाच महिन्यांचे सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) आणि टॉवर लोकेशन तपासासाठी मागविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे प्रकरणातील नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेवटच्या तीन दिवसांत ११ वेळा फोन – कोण होती ती व्यक्ती? आत्महत्येच्या तीन दिवसांपूर्वी, म्हणजे १६ ते १८ एप्रिल २०२५ दरम्यान एकाच मोबाईलवरून ११ वेळा फोन करणारी व्यक्ती कोण याचा तपास लागण्यासाठी हा अर्ज दाखल करण्यात आला होता. फिर्यादी अश्विन वळसंगकर यांच्या वतीने वकील अॅड. प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयात अर्ज सादर केला.त्यामध्ये सांगण्यात आले की, या कॉल्समागील व्यक्तीचा शोध लागल्यास डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येची खरी वस्तुस्थिती समोर येईल.

सरकार पक्ष आणि तपास अधिकाऱ्यांनीही या अर्जावर आपले म्हणणे मांडले. तपास अधिकाऱ्यांनी सात जणांच्या पाच महिन्यांतील सीडीआरसाठी पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगितले. मात्र, हे सीडीआर आधीच का मागविण्यात आले नाहीत? कुणाला वाचविण्याचा प्रयत्न झाला का?** असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

या प्रकरणात सात महिने पूर्ण झाले असून, पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यात शेवटच्या चार दिवसांतील कॉल डिटेल्स दिले असले तरी, विस्तृत पाच महिन्यांचे कॉल रेकॉर्ड आणि लोकेशन तपास अद्याप बाकी आहे.डॉ. वळसंगकर यांच्या शेवटच्या संवादात डॉ. उमा वळसंगकर, डॉ. शोनाली वळसंगकर, नेहा फडके आणि प्राजक्ता राऊत या व्यक्तींची नावे आल्याचे समजते.

आता पाच महिन्यांच्या सीडीआर आणि टॉवर लोकेशनच्या तपासानंतर घटनेपूर्वीचा मानसिक आणि सामाजिक ताण तसेच संबंधितांमधील संवाद स्पष्ट होण्याची शक्यता आहे.या तपासानंतर डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील सत्य उजेडात येईल का, याकडे संपूर्ण सोलापूरचे लक्ष लागले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments