सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरात राज्यातील जलजीवन मिशनचे कंत्राटदारांचे ११ महिन्यांपासून प्रलंबित देयकेसाठी १८०० कोटी निधी शासनाकडून खेचून आणल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदारचे राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले यांचा सोलापूर जिल्हा पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्यावतीने सन्मान करण्यात आला.
नगर जिल्ह्यातील संघटनानेही सत्कार केला. याप्रसंगी शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघचे उपाध्यक्ष कांतीलाल डुबल, सचिव कैलास लांडे, राज्य अभियंता संघटनाचे राज्य संघटक नरेंद्र भोसले, सोलापूर जिल्हा पाणीपुरवठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद तोडकरी, विवेक राठोड, सुर्यकांत बिराजदार, हेमंत
जाधव, प्रफुल्ल सोनी, रियाज शेख, सोमनाथ दावणे, मनोहर शिराळा, प्रमोद कुलाल, बाळासाहेब शिंदे,
आनंद वंजारे, प्रतीक पाटील, अमृत पवार तसेच महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे नगर जिल्हाअध्यक्ष समीर शेख, अक्षय कराड, गणेश श्रीरामसहित तसेच सोलापूर जिल्हा मजुर सहकारी संस्था चे सचिव सुधीर लांडे, विनोद क्षीरसागर, गणेश मुलगे, बहुसंख्येने जलजीवन मिशनची कामे केलेले कंत्राटदार सदर सोहळ्यास उपस्थित होते.

0 Comments