मोहोळचे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व डॉ. कौशिकतात्या गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 17, 2025

मोहोळचे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व डॉ. कौशिकतात्या गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 मोहोळचे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व डॉ. कौशिकतात्या गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ नागरी सहकारी पतपुरवठा संस्था आणि चंद्रमौळी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, तसेच मोहोळ शहरातील ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. कौशिकतात्या संदीपन गायकवाड यांचा वाढदिवस मोहोळ शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहात, स्नेहपूर्वक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

डॉ. गायकवाड यांची सहकार क्षेत्रातील वाटचाल दूरदृष्टी, प्रामाणिकपणा आणि लोकसंग्रह यामुळे सहकार क्षेत्रातील अभ्यासू, संयमी नेतृत्वाचा गौरव ठरला आहे.

सहकार क्षेत्रातील शिस्तबद्ध कामकाज, सामाजिक बांधिलकी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तत्पर मार्गदर्शन, आणि नम्र परंतु परिणामकारक नेतृत्व यामुळे ते मोहोळ तालुक्यात “तात्या” म्हणून प्रेमाने ओळखले जातात.

त्यांच्या प्रयत्नांमुळे नागरी आणि ग्रामीण दोन्ही पातळीवर पतसंस्था अधिक सक्षम आणि विश्वासार्ह झाल्या आहेत.

मोहोळमध्ये डॉ. गायकवाड यांच्या वाढदिवस निमित्ताने सकाळपासूनच विविध संस्था, सामाजिक संघटना, व्यापारी वर्ग, राजकीय व सहकार नेते, युवा समूह आणि नागरिक यांनी त्यांच्या कार्यालयात व निवासस्थानी भेट देत शुभेच्छांचा वर्षाव केला. शुभेच्छा देणाऱ्यांच्या लांबलचक रांगा दिवसभर पाहायला मिळाल्या.
सत्कार समारंभ, केक कापणे तसेच अनेक सामाजिक उपक्रमांनी हा वाढदिवस अधिक अर्थपूर्ण बनवला.

काही संस्थांनी केवळ शुभेच्छा देण्यावर न थांबता रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता उपक्रम, गरजूंसाठी साहित्य वाटप कार्यक्रम यांचे आयोजन करून वाढदिवसाला सामाजिक स्पर्श दिला.

मान्यवरांची मोठी उपस्थिती

वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे नेते चरणराज चवरे, शिवसेनेचे नेते रमेश बारसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, दुध संघाचे माजी संचालक सज्जन पाटील (लांबोटी), संजय विभुते (बेगमपूर), चेअरमन राजेश खपाले, व्हाइस चेअरमन राकेश देशमाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तेजस बोबडे, जगन्नाथ कोल्हाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सचिन पाटील, नितीन गुंड (कोठारी ग्रुप), विनय काळे, नानासो साठे, नितीन रेळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक देशमुख, विधिज्ञ हिंदूराव देशमुख, छोटू देशमुख, डॉ. सुनील गायकवाड, डॉ. कोकले, उद्योजक विजय कोकाटे (तांबोळे), बिलाल मुजावर, उद्योजक विष्णू थिटे, देसाई, मोहन राऊत, बेलदार (ग्लेनमार्क), विजय गरड, सुधीर वागज, कृषी निष्ठ पुरस्कर्ते सुग्रीव व्यवहारे (आढेगाव), सदाशिव मेंढे (चिखली), सुरेश घाडगे, गणेश ननावरे, मोहन होनमाने (गोटेवाडी) बंडू देशमुख, संतोष अनुषे, श्रीनिवास माने, सौ. लंबे, बेडगे परिवार, नाना डोके (युवा उद्योजक), चंद्रकांत वाघमोडे (भावी नगरसेवक) आदींनी डॉ. गायकवाड यांचा सत्कार करून त्यांच्यावरील आदर पुन्हा अधोरेखित केला.

तसेच हरिओम मित्र मंडळ, चंद्रमौळी ग्रामीण बिगरशेती पतपुरवठा संस्था कर्मचारी, मोहोळ नागरी पतपुरवठा संस्था कर्मचारी, चंद्रमौळी औद्योगिक सहकारी वसाहत कर्मचारी यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

डॉ. गायकवाड यांची कृतज्ञ प्रतिक्रिया

शुभेच्छांचा वर्षाव आणि प्रेम पाहून भावूक झालेल्या डॉ. कौशिकतात्या गायकवाड म्हणाले, “हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. मोहोळच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर राहीन.”

शहरभर उत्साहाचे वातावरण

दिवसभर मोहोळ शहरात वाढदिवसाचा उत्साह कायम होता.
सामाजिक बांधिलकी, सहकारभाव आणि नेतृत्वगुण यातून डॉ. गायकवाड यांनी केलेले कार्य आज पुन्हा एकदा जनतेने मनोमन मान्य केले.
समाजातील सर्व स्तरातून मिळालेल्या आदर, प्रेम आणि विश्वासाने त्यांची लोकप्रियता अधिकच दृढ झाल्याचे दिसून आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages