प्रभाग १० मध्ये गिरिजा अरुण गोफणे यांच्या प्रभावी प्रचारामुळे शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीने मतदारांचे मन जिंकले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 29, 2025

प्रभाग १० मध्ये गिरिजा अरुण गोफणे यांच्या प्रभावी प्रचारामुळे शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीने मतदारांचे मन जिंकले

 प्रभाग १०  मध्ये गिरिजा अरुण गोफणे यांच्या प्रभावी प्रचारामुळे शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीने मतदारांचे मन जिंकले





अरुण गोफणे यांची सक्षम प्रचार यंत्रणा आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गिरीजा गोफणे यांच्या विजयासाठी आशादायक

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-


प्रभाग क्रमांक दहा मध्ये दिवसेंदिवस प्रचाराची चुरस वाढताना दिसत असूनही या प्रभागातून शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्ह घेऊन निवडणूक लढवत असलेल्या गिरीजा अरुण गोफणे यांनी प्रत्येक सर्वसामान्यांमध्ये मिसळून आपल्या प्रचाराला सुरुवात केल्यामुळे त्यांच्या प्रचाराला मोठा जनाधार मिळताना दिसत आहे. अरुण गोफणे हे प्रभाग क्रमांक दहा मधील गेल्या पंधरा वर्षापासून राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले युवा व्यक्तिमत्व आहेत. गतवेळी त्यांनी निवडणूक लढवत पहिल्याच प्रयत्नात मोठे मतदान खेचून घेतले होते. त्यांच्या मतदान खेचून घेण्यामुळे काही दिग्गज उमेदवारांना पराभवाचा फटका बसला होता.

 यावेळी गिरीजा गोफणे आणि अरुण गोफणे या दांपत्याने या प्रभागातील गाढवे वस्ती माने वस्ती या परिसरात असलेल्या स्नेहांसमवेत संपर्क साधून प्रचाराची रणनीती मोठ्या प्रमाणात यशस्वी केली आहे. अरुण गोफणे हे बांधकाम क्षेत्रात सक्रिय असल्यामुळे बांधकाम कामगारांशी त्यांचा मोठा परिचय वर्ग आहे. याशिवाय या प्रभागातील शहरी भागात त्यांचा अनेक घटकांशी नित्य संपर्क असल्यामुळे त्यांच्या सुविदय पत्नी गिरीजा गोफणे यांना त्याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्याचे सर्वेसर्वा खासदार  धैर्यशील मोहिते पाटील, मोहोळ चे माजी आमदार तथा सिंघम नेते रमेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण गोफणे यांनी प्रचार अभिनव पद्धतीने करत जनसंवाद दौरे प्रभाग बैठका त्याचबरोबर डोअर टू डोअर प्रचारावर भर दिला आहे. 

चौकट
पक्षाचे चिन्ह तुतारी प्रत्येक सर्वसामान्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत असताना पक्षाची विकास धारा आणि विचारधारा त्याचबरोबर पक्षाचा विकासनामा आणि वचननामा मुद्रित स्वरूपात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्यामध्ये गिरिजा अरुण गोफणे यांना यश मिळाले आहे. त्यामुळे गिरीजा गोफने यांचा प्रभागातील विजय निश्चित मानला जात आहे. या प्रभागातील सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून गिरीजा गोफणे यांच्याकडे पाहिले जात असून दिग्गज पक्षाच्या अनेक मातब्बर उमेदवारांना बाजूला सारत मतदारांनी गिरीजा गोफणे यांना प्रतिसाद द्यायला प्रारंभ केल्यामुळे अनेक दिग्गज उमेदवारांच्या पायाखाली वाळू सरकली आहे. त्यामुळे गिरीजा गोफणे यांची उमेदवारी महत्त्वाची ठरत असून अरुण गोफने यांच्या संपर्क यंत्रणेच्या माध्यमातून त्यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages