Hot Posts

6/recent/ticker-posts

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदासाठी SSB कोर्सचे आयोजन

 भारतीय सैन्यदलनौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदासाठी 

SSB कोर्सचे आयोजन

 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- भारतीय सैन्यदलनौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना Service Selection Board (SSB) परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे SSB कोर्स क्र. ६३ चे आयोजन करण्यात आले आहे. हा कोर्स दिनांक ०३ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार असून प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षणनिवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहेअशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीसोलापूर मेजर मिलिंद दे. तुंगार (नि.) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी प्राप्त करण्यासाठी दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयसोलापूर येथे मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या संकेतस्थळावरून SSB-63 कोर्ससाठीचे प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टांची प्रिंट घेऊन ती पूर्ण भरून सोबत आणणे आवश्यक आहे.

 

एसएसबी कोर्ससाठी पात्रता (कोणतीही एक आवश्यक): 

अ) कंम्बाईड डिफेन्स सव्हींसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) उत्तीर्ण व SSB मुलाखतीसाठी पात्रता प्राप्त. 

ब) एनसीसी सर्टिफिकेट किंवा ग्रेडमध्ये उत्तीर्ण व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरकडून SSB साठी शिफारस प्राप्त. क) टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी SSB मुलाखतीसाठी कॉल लेटर प्राप्त. ड) विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) अंतर्गत SSB कॉल लेटर प्राप्त किंवा शिफारस यादीत नाव असणे.

 

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारीछात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक यांच्याशी ईमेल training.pctcnashik@gmail.com या आयडीवर किंवा दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 तसेच व्हाट्सअ‍ॅप क्रमांक 9156073306 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीसोलापूर यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments